शिरूर तालुका

दहिवडीत ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकून युवकाचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): दहिवडी (ता. शिरुर) येथील दहिवडी आंबळे रस्त्यालगत चांदणीचा घाट येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असेलल्या ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकून सलमान सलीम मुलाणी या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

दहिवडी (ता. शिरुर) येथील दहिवडी आंबळे रस्त्याने सलमान मुलाणी हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच १२ क्यू एल ८३१३ या दुचाकीहून जात असताना समोर चांदणीचा घाट येथे रस्त्याच्या कडेला ऊसाने भरुन उभ्या असेलल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला सलमानच्या दुचाकीची धडक बसून सलमान गंभीर जखमी झाला.

यावेळी नागरिकांनी त्याला उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सलमान सलीम मुलाणी (वय ३२) रा. टाकळी भीमा (ता. शिरुर) जि. पुणे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घडलेल्या घटनेबाबत विशाल बाळासाहेब लवांडे (वय २७) रा. मांजरेवस्ती दहिवडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago