शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेचा कंपनीच्या ठेकेदाराने विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कैलास कोंडल याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेची कंपनीतील कामातून ठेकेदार कोंडल याच्या सोबत ओळख झालेली होती. त्यानंतर कोंडल महिलेच्या घरी येऊन महिलेच्या पतीला महिलेबाबत काहीही बोलू लागला. त्यामुळे महिला एका सोसायटीमध्ये राहायला गेली.
मात्र त्यानंतर देखील ठेकेदार कोंडल पुन्हा महिलेच्या घरी जाऊन महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे भाष्य करु लागला. त्यामुळे याबाबत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी कैलास कोंडल (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याचे विरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…