शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर शहरातील पोस्ट ऑफिस जवळून एका व्यक्तीच्या कारची काच फोडून कार मधील 2 लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर येथील पोस्ट ऑफिस जवळ मंगेश महाडिक हे दुपारचे सुमारास काही कामानिमित्ताने आलेले असताना त्यांनी त्यांची एम एच १२ जे ई ०७०७ या कारचे शीट मध्ये 2 लाख रुपये पिशवीत ठेवून वरुन कापडाने झाकून ठेवलेले होते. सायंकाळ चे सुमारास महाडिक हे कार जवळ आले असता त्यांना कारची काच फुटलेली दिसली.
त्यामुळे त्यांनी कार मध्ये पाहणी केली असता कारच्या शीट मध्ये ठेवलेली 2 लाख रुपयांची रक्कम लंपास झाल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे कारमधील 2 लाख रुपयांची चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने मंगेश विठ्ठल महाडिक (वय ३४) रा. उक्कडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस करत आहे.
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…
खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…
अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…
अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…