Shikrapur Police Station
शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे एका जमिनीच्या खरेदीखताला साक्षीदार झालेल्या एका व्यक्तीच्या घरात घुसून शिवीगाळ, दमदाटी करत कोयत्याने मारुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शहाजी खंडेराव ढोकले या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
करंदी (ता. शिरुर) येथील शहाजी ढोकले यांची जमीन त्यांचे वडील खंडेराव ढोकले, भाऊ जिजाबा ढोकले, रतन ढोकले व बहिण कल्याणी ठाकर यांनी काही वर्षापूर्वी गावातील जांभळकर व गावडे कुटुंबियांना विक्री केली होती. सदर जमिनीच्या खरेदीखताचे वेळी दिलीप दशरथ ढोकले यांनी जमिनीच्या खरेदीखतावर सही केलेली असून सध्या त्या जमिनीचा न्यायालयात दावा सुरु आहे.
सदर जमिनीच्या खरेदीखतावर सही करणाऱ्या दिलीप ढोकले यांच्या घरी शहाजी ढोकले हा अनाधिकाराने गेला यावेळी घरातील दिलीप ढोकले यांचा पुतण्या रवींद्र ढोकले यांना शिवीगाळ, दमदाटी करत तुम्ही आमच्या जमिनीच्या खरेदीखताला साक्षीदार का झाला असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊ लागला तसेच दिलीप दशरथ ढोकले याला कोयत्यानेच मारतो आणि तुम्हाला देखील जिवंत ठेवत नाही, अशी धमकी दिली.
याबाबत रवींद्र शंकर ढोकले (वय ४७) रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शहाजी खंडेराव ढोकले रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…