zende-family-aamble
शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून गुरुवारी (ता. २९) रात्री ११ च्या दरम्यानपायी घरी परतणाऱ्या झेंडे कुटुंबातील तिघांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
शिरूर-चौफुला रस्त्यावरील हॉटेल केसरीसमोर गुरुवारी (दि. २९) रात्री साडेअकराच्या सुमारास ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. या अपघातात आणखी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात कौशल्या वसंत झेंडे, आरुषी दत्तात्रय झेंडे आणि सोहम राजीव झेंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धार्मिक कार्यक्रमातून आनंदाने घरी परतणाऱ्या या तिघांवर काळाने अचानक घाला घातल्याने संपूर्ण आंबळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आंबळे येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर झेंडे कुटुंबातील सदस्य रात्री पायी घरी निघाले होते. याचवेळी शिरूर-चौफुला मार्गावरील हॉटेल केसरीसमोर आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती गावात समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धार्मिक कार्यक्रमातून घरी परतणाऱ्या भाविकांनाही सुरक्षितपणे चालण्यासाठी रस्त्यावर जागा उरली नाही का, असा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे. अपघातातील तिन्ही मृतदेहांवर शुक्रवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता आंबळे स्मशानभूमीत एकत्रित शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एका क्षणात तीन जीव गेले, एका कुटुंबाचा आधार हरपला आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली. या हृदयद्रावक घटनेने आंबळे परिसर सुन्न झाला आहे.
शिरूर! राजस्थान ढाबा पार्किंगमध्ये भीषण अपघात; ट्रक अंगावरून गेलेल्या तरुणाचा मृत्यू…
Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू तर तिघे जखमी…
शिरूर तालुक्यात भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी…
शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…
Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात आईचा जागीच मृत्यू, दोन चिमुकले जखमी…
सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…
कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…
केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी…
‘आरक्षणाच्या जागा कमी झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार’; ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केंद्राकडे पाठपुराव्याची मागणी…
२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चक्क पोलीस ठाण्यासमोरच दोन…