क्राईम

अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला; चिमुकलीवर वर्ग मित्राकडून, तर महिलेवर सामूहिक अत्याचार

यवतमाळ: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या महिला अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला आहे. यातील एक घटना बाभुळगाव, तर दुसरी घटना दारव्हा तालुक्यात घडली. बाभुळगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत तिसरीतील विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील विद्यार्थ्याने अत्याचार केला, तर दारव्हा तालुक्यात महिलेवर पाच जणांनी निर्जनस्थळी नेऊन रात्रभर अत्याचार केला.

दारव्हा ते बागवाडी मार्गावर एका ३४ वर्षीय महिलेशी पाच जणांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना ३ ऑगस्टच्या मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणी महिलेच्या बहिणीने पोलिसांकडे रविवारी उशिरा दिलेल्या तक्रारीवरून आरोपी संकेत पवार (वय २६), किशोर सूर्यवंशी (वय ३६), सौरभ कासारदार (वय २९) सर्व रा. बागवाडी, वेदान्त पोकळे (वय २६) रा. कुंभारकिन्ही पुनर्वसन, तसेच एका विधिसंघर्ष बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विधीसंघर्षग्रस्त बालक वगळता इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिला ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता बागवाडी येथे बहिणीकडे गेली होती. घरी परतत असताना आरोपींनी तिला रस्त्यात अडवून एका लेआऊटवर नेले आणि रात्री ९ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेबाबत पीडितेच्या बहिणीने १० ऑगस्ट रोजी दारव्हा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत बाभुळगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत तिसरीतील मुलीवर तिच्याच वर्गतील मुलाने बाथरूम मध्ये नेऊन अत्याचार केला. हे कृत्य करण्यात त्याला एका मुलीनेही त्याला मदत केली. ही घटना १ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने रविवारी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विधीसंघर्षग्रस्त मुलगा व त्याला मदत करणारी त्याच इयत्तेतील मुलगी अशा दोघांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. एकाच गावातील एकाच वर्गात शिकणाऱ्या इयत्ता तिसरीतील नऊ वर्षीय मुलाने व मुलीने केल्याचे उघड झाल्यानंतर समाजमन सुन्न झाले.

पीडित बालिकेच्या जनेंद्रियावर जखम दिसल्याने तिने याबाबत विचारणा केली असता, मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने बाभुळगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या संवेदनशील प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरून दोन्ही विधीसंघर्षग्रस्त मुलांविरोधात पॉक्सो अन्वयेगुन्हा नोंद केला आहे. दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. मुलाला यवतमाळ येथील बाल निरीक्षण गृहात तर त्याला मदत करणाऱ्या मुलीला अमरावती येथील बाल निरीक्षण गृहात ठेवले आहे. पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आता तिची प्रकृती बरी असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. या घटनांनी समाजमन ढवळून निघाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

5 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

5 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

6 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

11 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

11 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

11 तास ago