मुख्य बातम्या

रांजणगावच्या महागणपती मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) अष्टविनायकापैकी महागणपती म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या रांजणगाव गणपती येथे आज (दि १२) रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्री महागणपतींचा महाभिषेक करुन मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

श्री क्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री मंगलमूर्ती विद्याधाम, रांजणगाव गणपती शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच अनेक भाविकांनी सहभाग घेतला.

 

महागणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टतर्फे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मंदिर गाभारा व परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता.

 

अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व अष्टविनायक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

या प्रसंगी मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, देवस्थान कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरुच; रांजणगावजवळ लोखंडी रोडने वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

1 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago