क्राईम

पुणे जिल्ह्यात डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स आली आणि दरीत कोसळून 8 ते 9 महिलांचा मृत्यू…

पुणे: जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाविकांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात 9 महिलांचा मृ्त्यू झाला आहे. पाईट येथील कुंडेश्वरचे डोंगर चढताना भाविक प्रवाशांनी भरलेली पिकअप रिव्हर्स आली अन् 5 ते 6 वेळा पलटी घेत दरीत कोसळली.

या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. आज दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास हा अपघात घडलाय. गावातील शेतकरी महिला श्रावण सोमवारनिमित्ताने देवदर्शनासाठी निघाल्या असता ही मन हेलावून टाकणारी घटना घडली.

खेड जवळील लगतच्या गावातील 25 ते 30 प्रवासी ज्यामध्ये महिला आणि लहानगी मुलेही होती, हे सर्वजण कुंडेश्वर मंदिरात दर्शनाला निघाले होते. तिसरा श्रावणी सोमवार असल्यानं इथं भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, देवदर्शनासाठी निघालेल्या या महिलांवर काळाने घाला घातला. मंदिराकडे जाणाऱ्या नागमोडी वळणाने वरती येत असताना, प्रवाशांनी भरलेली पिकअप अचानकपणे रिव्हर्स आली अन् 5 ते 6 वेळा पलटी घेत, दरीत कोसळली. या दुर्घटनेत 20 महिला आणि लहान मुलं गंभीर जखमी झाल आहेत.

दुर्दैवाची बाब म्हणजे आत्तापर्यंत 7 भाविकांचा मृत्यू झालाय. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी जखमींवर उपचार सुरू असलेल्या एका रुग्णालयात धाव घेत घटनेची व परिस्थितीची माहिती घेतली. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं होतं. मात्र, प्रशासनाकडून लवकर रुग्णवाहिका व मदत न मिळाल्याने काही भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

8 ते 9 महिला दगावल्या; आमदार बाबाजी काळे

दरम्यान, या घटनेनं खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, पोलीस प्रशासन व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जशा रुग्णवाहिका भेटल्या, खासगी वाहनं भेटली तशी जखमींना जवळील खासगी व सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी केली. या दुर्घटनेत 8 ते 9 महिला दगावल्याची माहिती आहे, असे आमदार काळे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

12 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

12 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

12 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

12 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

12 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

12 तास ago