क्राईम

चोरी करून चालवलेले नदीवरील बंधाऱ्याचे ढापे वडनेर ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडले…

शिरूर (अरुणकुमार मोटे): पावसाळा सुरू होत आहे. यामुळे नदीवरील बंधाऱ्यातील ढापे काढून ठेवण्यात आले होते. आज शनिवार (दि. १७) रोजी पहाटे एक -दीडच्या सुमारास हे ढापे चार-पाच जणांनी टेम्पोमध्ये भरून चोरी करुन घेऊन जात होते.

अचानक नाथा शंकर निचित यांच्याकडे मजुरी करत असणाऱ्या मजुरास जाग आली. बाहेर काहीतरी वाजते याचा कानोसा घेत नाथा निचित यांना फोन केला. दोघेजण बंधाऱ्याचे डावीकडून ढापे ठेवलेल्या ठिकाणी आले असता ढापे कमी झालेले दिसले. त्यांनी ताबडतोब तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष निचित यांना फोन करून सदरची घटना कळवली. तंटामुक्ती अध्यक्षांनी तातडीने पोलिसांना फोन केला.

ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निचित यांच्या मदतीने गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तर गाडी कोणत्या दिशेने गेली हे न समजल्याने घटनास्थळी जाऊन गाडीच्या टायरच्या खुनाचा मागवा घेत त्यांनी गाडीचा पाठलाग केला. त्याचवेळी उपसरपंच विक्रम निचित यांना फोन केला. व CCTV कॅमेरे चेक करण्यास सांगितले व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना फोन करून सतर्क करण्यास सांगितले.

दरम्यान पंचतळे या ठिकाणी पोलिसांची रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणारी गाडी होती. सदरचा टेम्पो जांबुतच्या दिशेने जात होता तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष निचित, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निचित, नाथा निचित, संतोष थोरे हे गाडीचा पाठलाग करत होते. समोरून पोलीस व पाठीमागून ग्रामस्थ यामुळे चोरांनी गाडी ब्रिटानियाच्या डेअरीकडे वळवली. परंतु समोरच पांडाशेठ जगताप उभे होते. चोरट्यांचा जगताप यांना धमकावत पळ काढला. पांडाशेठ यांनी गाडी ड्रायव्हर ला पकडून ठेवले. पोलीस आणि ग्रामस्थ तिथे पोहचले व टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान ग्रामस्थांच्या सतर्कतेने चोर व टेम्पो पकडले गेला. त्यामुळे हे चोर पकडणाऱ्या ग्रामस्थांचे जांबुत, वडनेर, टाकळी हाजी परीसरातील नागरीकांच्या वतीने कौतुक होत आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर धनंजय थेऊरकर व त्यांचे सहकारी करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

2 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

16 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

16 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

16 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

16 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

16 तास ago