महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार

मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून आणि देशभर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे राजकीय अजेंडा असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, “अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या आडून भाजप-आरएसएसनेच २०१४ मध्ये आपला राजकीय अजेंडा राबवला होता. त्यामुळेच आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही त्यांना अजेंडा दिसतो,” असा पलटवार सपकाळ यांनी केला.

सपकाळ म्हणाले की, नीट परीक्षा आणि सीबीएसईच्या कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी झाली असून देशभर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अशा वेळी आंदोलनाला बदनाम करण्याऐवजी सरकारने आपल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी.

विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईचाही त्यांनी निषेध केला. “दिल्लीत विद्यार्थ्यांना जनावरांसारखी मारहाण करण्यात आली. अल्पवयीन विद्यार्थ्यांनाही सोडले नाही, मुलींशी गैरवर्तन झाले. या अमानुष लाठीहल्ल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थन करतात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजप सरकारवर टीका करताना सपकाळ म्हणाले की, सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही, आंदोलनजीवी किंवा इतर शिक्के मारण्याची भाजपची जुनी पद्धत आहे. मात्र, काँग्रेस विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर थेट रस्त्यावर उतरून लढत राहील. राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गुंज’ अभियानाद्वारे हा मुद्दा सर्वप्रथम उचलला असून, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा संघर्ष पुढेही सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

6 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

6 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

6 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

6 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

6 तास ago