शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबातील सर्व सदस्य शेतीच्या कामासाठी शेतात गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाट फोडत तब्बल १७ तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे ८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता बाळासाहेब पडवळ (वय ५२, रा. संविदणे, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. २१ जुलै रोजी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास मुलगा अजय घराकडे मोटार बंद करण्यासाठी आला असता मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर सर्वजण घरी धावले.
घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील लाकडी व लोखंडी कपाटे फोडलेली आढळली. कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले होते. पाहणी केली असता कपाटात ठेवलेले साडेतीन तोळ्यांचे गंठण, विविध मंगळसूत्रे, सोन्याची चैन, पुरुष व महिलांच्या अंगठ्या, कानातील दागिने व कर्णफुले असा एकूण १७ तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांच्या हालचाली आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत करीत आहेत.
दरम्यान, शिरूर तालुक्यात ग्रामीण भागात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी चोरीनंतर दिवसा देखील पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…