लोणीकंद : सार्वजनिक नळावर पाणी भरताना झालेल्या भांडणात एकाने पोटात लाथ मारल्याने महिलेचा गर्भपात झाला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी रोहित रवी धोत्रे, रवी धोत्रे आणि शांताबाईल रवी धोत्रे (सर्व रा. गोरेवस्ती गायरान, वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीत १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता हा प्रकार घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घराजवळील सार्वजनिक नळावर पाणी भरत असताना त्यांच्या शेजारील रोहित धोत्रे याने फिर्यादीचा नळाखालील हंडा बाजुला सरकवला. त्यावर फिर्यादी यांनी त्याला माझा नंबर आधी आहे. तू मला पाणी भरु दे. माझे झाल्यानंतर तू पाणी भर असे सांगितले. त्यावर तो शिवीगाळ करु लागला. त्याचे वडिल रवी धोत्रे व आई शांताबाई धोत्रे हे सुद्धा तेथे आले. तेही शिवीगाळ करुन दमदाटी करु लागले. त्यावर फिर्यादीने माझा नंबर पहिला आहे, मी पाणी भरते, त्यानंतर तुम्ही पाणी भरा, असे सांगितले. तेव्हा रोहित याने त्यांच्या गालावर चापट मारली. त्याच्या आई वडिलांनी हाताने मारहाण केली.
रोहित याने त्यांच्या पोटावर लाथ मारहाण केल्याने त्या नळाजवळ पडल्या. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखू लागले. त्यांना ससून रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी गर्भपात झाल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…
शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…
मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…
मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…
२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…