आरोग्य

पोटाची चरबी आणि मांड्या कमी करणे काही नियम व घरगुती उपाय…

१) भुजंगासन:- केल्यामुळे तुमचे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल. भुजंगासन करण्यासाठी आधी तुम्ही पोटावर झोपा नंतर दोन्ही हात छातीवरच्या बाजूला ठेवा. आणि त्यानंतर हळूवार श्वास घेत हळूहळू शरीर वर उचला. हा प्रकार करत असताना तुमची नाभी सुद्धावर उचलली जाईल याचा प्रयत्न करा. त्यानंतर नॉर्मल श्वास घेत आपल्या शरीराला सरूवातीच्या स्थितीत आणून ठेवा. हे आसन १० ते १२ वेळा करा असे केल्यास पोटावरची चरबी निघून जाण्यास मदत होईल.

2) उष्ट्रासन:- करण्यासाठी पायांना लांब करून बसा आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला वाकवा. तुमच्या टाचा मागच्या भागाला टच होईल असे ठेवा. हे करत असताना श्वास सोडत असताना कमरेच्या मागच्या भागाला मागे ढकला मग उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा. किंवा समान पकडलं तरी चालेल. या गोष्टीकडे लक्ष असू द्या की खाली वाकत असताना मानेला त्रास होईल अशी हालचाल असू नये हे आसन ३ ते ४ वेळा दररोज करा. हे आसन केल्याने कंबरेचा आणि पोटाचा आकार कमी होण्यास मदत होईल.

३) नौकासन:- सर्व प्रथम पोटावर झोपा. पाय जुळलेले असावे. हात शरीराजवळ असावेत. पूर्ण श्वास सोडावा आणि श्वास घेत दोन्ही हात आणि पाय एकाचवेळी जमिनीपासून 30 अंश वर उचलावे. म्हणजे संपूर्ण शरीराचा बॅलन्स पोटावर आले पाहिजे ह्या स्थितीत थोडे थांबावे आणि सावकाश आसन सोडावे. वजन कमी होते आणि तुम्ही वजनावर नियंत्रण मिळवून पाहिजे तशी फिगर मिळवू शकता.

सूर्यनमस्कार:- सूर्यनमस्कार शास्त्रोक्त (पूरक कुंभक रेचक) या पद्धतीने सातत्य पूर्वक केल्यास वजन कमी होण्यास खूप चांगला फायदा होतो  वजन कमी होण्याबरोबरच पोटावरील, सीटवरील आणि मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी, सूर्यनमस्कार सारखा दुसरा व्यायाम नाही.

प्राणायाम:- समस्त शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कपालभाती व अनुलोंमविलोम हा रामबाण उपाय मानला जातो. सतत या पध्दतीने योगा केल्यास आपल्याला ‍चांगले परिणाम दिसायला लागतात.

रात्रीचे उशिराचे जेवण:- रात्री उशीरा जेवण केल्याने पोटावरील चरबी वाढते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी किमान २ तास तुमचे जेवण झालेले पाहिजे. तेही नेहमीच्या जेवणापेक्षा अर्धे जेवण संध्याकाळी आठ पूर्वी आठ नंतर जेवणार असाल तर शक्यतो रात्रीचे जेवण टाळावे.

शतपावली:- रात्री जेवणानंतर आपण लागलीच झोपतो व पर्यायी आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी तयार होते, पर्यायाने ती चरबी आपल्याला पोटावर दिसते. जेवण केल्यानंतर कमीत कमी आपण शंभर पावले तरी चालले पाहिजे. त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यानंतर थोडावेळ का होईना फिरायला जाण्याची सवय लावा.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 दिवस ago