वाघोली : गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने एका युवकाचा मृत्यु झाला आहे. वाघोली येथील आयव्ही इस्टेट येथे गुरुवारी (ता. २८) रात्री सात वाजता ही घटना घडली आहे.
गणेश बाळकृष्ण दळवी (वय ४४, रा. उमंग होम प्राईमो सोसायटी, आयव्ही इस्टेट, वाघोली) असे मृत युवकाचे नाव आहे. त्यांच्या मागे आई, वडिल, पत्नी व दोन मुले आहेत. गणेश यांच्या मृत्युमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उमंग होम प्राईम सोसायटीच्या गणपती मंडळाची गणेश विसर्जन मिरवणुक गुरुवारी सायंकाळी सुरु होती. बँजोच्या तालावर गणेश दळवी हे नाचत होते. पण, नाचता-नाचताच दळवी अचानक खाली कोसळले. त्यांच्या सहकार्यांनी त्यांना तत्काळ वाघोली येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले.
रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई; 8 गावठी पिस्टल जप्त; धाबे दणाणले…
कवठे येमाईत ओढ्यात पाय घसरुन पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४८ तासांनंतर सापडला
निमगाव भोगी येथील युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल
शिरूर तालुक्यात रक्षाबंधनासाठी भावाकडे जाण्याच्या तयारीत असतानाच बहिणीचा मृत्यू…
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात शिरुर येथील पती-पत्नी व मुलीचा मृत्यू…
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…
खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…
अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…
अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…