निमगाव भोगी येथील युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे गणपतीच्या मंदिरात दर्शनाला जातो असे सांगत घराबाहेर पडलेल्या युवकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी झाली त्यानंतर त्या युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत खंडाळा माथा येथे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आदित्यचा मानसिक छळ करुन पळुन जाण्यास व गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोलपंपावरील सुहास वडघुले आणि विजय शिंदे दोन कर्मचाऱ्यांवर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

 

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष पावसे यांचा पुतण्या आदित्य हा (दि 20) सप्टेंबर रोजी रात्री 11:30 वाजता माझे मित्र आले आहेत. असे सांगून घरातून निघून गेला. तो रात्री घरी न आल्याने त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्याचा मित्र लांडे याने त्याचा मित्र अजिंक्य नरवडे यांच्यासोबत रांजणगावला गणपतीला गेले आहेत. तसेच रात्री त्यांची रांजणगाव येथील पेट्रोल पंप वाल्यांसोबत वादावादी झाली तेव्हा आदित्य तिथून पळून गेला आहे अशी माहिती दिली होती.

 

त्यानंतर (दि 21) सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास संतोष पावसे यांचा पुतण्या आदित्य रामदास पावसे याचा मृतदेह रांजणगाव येथील खंडाळे माथ्याजवळ एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर संतोष पिरभाऊ पावसे (वय 39) रा. खराडी बालाजी हॉस्पिटल शेजारी, पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली त्यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला धाव घेत फिर्याद दाखल केली होती.

 

निमगाव भोगी ग्रामस्थांनी आदित्य याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या रांजणगाव येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. तर त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत रांजणगाव गणपती येथील पुणे-नगर महामार्गावरील राजमुद्रा चौकात काही वेळ ठिय्या मांडला. त्यामुळे वातावरण तणावपुर्व झाले होते. रांजणगाव MIDC पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश ढवाण करत आहेत.