ठाणे: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका वेटरची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिळ-डायघर पोलिसांनी संशयित पतीला अटक केली असून अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा उलगडा केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिळ-डायघर परिसरातील पिंपरी गाव येथील भातशेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव प्रकाश बिसा असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता. प्रकाश हा नवी मुंबई येथील महापे परिसरातील एका कॅन्टिनमध्ये वेटर म्हणून काम करत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला.
या घटनेनंतर शिळ-डायघर पोलिस ठाण्यात हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे शिळ गावात राहणाऱ्या 39 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
पत्नीशी प्रकाश याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. या संशयातून त्याने प्रकाशला मद्यपान करण्याच्या बहाण्याने पिंपरी गावातील भातशेतात नेले आणि त्याच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलिस निरीक्षक गजेंद्र राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत खरात, अनिल राजपूत आणि योगेश लामखडे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.
दरम्यान, नाशिक जिल्हा मधील बागलाण तालुका येथील दोदेश्वर परिसरातील मुळेश्वर डोंगर येथे बुधवारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृत तरुणाची ओळख विष्णू बळीराम माळी (वय 25, रा. आराई) अशी पटली आहे. पंचनामा आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…