क्राईम

बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार

बीड: दिवसेंदिवस बीडमध्ये गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधील आणखी एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बीडमधील एका पोलीस उपनिरीक्षकाने गावातील विवाहित महिलेवर बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीने अत्याचार केला असून, पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ शूट करून तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप आरोपीला अटक झालेली नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

रवींद्र शिंदे असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. आरोपीचे गावातीलच विवाहित महिलेवर वाईट नजर होती. घटनेच्या दिवशी आरोपीनं महिलेवर जबरदस्ती केली. नंतर तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करत त्यानं महिलेचे काही विवस्त्र फोटो काढले. तसेच या फोटोंच्या आधारे त्यानं पीडित महिलेला ब्लॅकमेल केलं.

पीडितेन आरोपीच्या त्रासाला कंटाळून शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी रवींद्र शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मोकाट असून, अद्याप तो पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.

सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर रक्षकच बनले भक्षक, असं महणण्याची वेळ आली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी पोलीस अधिकाऱ्याविरोधात रोष व्यक्त केला असून, आरोपीचा शोध आणि पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

15 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

19 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

19 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

19 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

19 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

19 तास ago