महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मिळणार; मंत्री आदिती तटकरे

संभाजीनगर: राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत जाहीर केलं आहे की, अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावावर सरकारने कार्यवाही सुरू केली आहे.

अंगणवाडी सेविका ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब, गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक आधारस्तंभ ठरल्या आहेत. त्या महिलांच्या आणि बालकांच्या पोषण, शिक्षण आणि आरोग्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन वर्षानुवर्षं सेवेत आहेत. मात्र, सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या भविष्यासाठी काहीच हमी नव्हती. आता सरकारने पेन्शन व ग्रॅज्युइटीचा प्रस्ताव पुढे नेल्यामुळे त्यांचं भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे.

या निर्णयामागील पार्श्वभूमी

राज्यात सुमारे २ लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत

मार्च २०२५ व एप्रिल २०२५ चे मानधन रखडल्यामुळे सेविकांनी एप्रिलमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर जोरदार मोर्चा काढला. या आंदोलनाची दखल घेत महिला व बालविकास विभागाने पेन्शन व ग्रॅज्युइटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला.

सेविकांचे मानधन केंद्र, राज्य व अतिरिक्त राज्य निधीतून अदा केलं जातं

मार्चचे मानधन २५ एप्रिलला आणि एप्रिलचे मानधन ६ मेला अदा करण्यात आले.

मंत्री आदिती तटकरे यांचे विधान

अंगणवाडी सेविकांना पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्यासाठी प्रस्ताव कार्यवाहीत असून, नियमित मानधन देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे.

या निर्णयाचे थेट फायदे

सेविकांना सेवानिवृत्तीनंतरही आर्थिक सुरक्षा

शासनाची किमान वेतन लागू करण्याची तयारी

प्रलंबित मागण्यांना मिळत आहे न्याय

सेविकांच्या कष्टांना मिळतोय सन्मान व सन्मानाने निवृत्ती

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago