मनोरंजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच घेतली आहे.

पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. काही नेटकऱ्यांनी रितेश देशमुख यांचा लूक शिवरायांसारखा वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे, तर अनेकांनी या ऐतिहासिक चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विकी कौशलची खास प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने या पोस्टरवर खास कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने ‘आबा साहेब’ अशी कमेंट केली आहे. संभाजी महाराज आपल्या वडिलांना छत्रपती शिवाजी महाराजांना ‘आबा साहेब’ अशी हाक मारत असत, या ऐतिहासिक संदर्भामुळे ही कमेंट विशेष चर्चेत आली आहे.

पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होणार

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित केला जाणार आहे. मराठी आणि हिंदी भाषेसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भारतीय भाषांमध्येही हा चित्रपट रिलीज केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख यांचा हा पहिलाच चित्रपट असल्याने त्याबाबत उत्सुकता अधिक आहे.

रिलीज डेट जाहीर

पोस्टरसोबत चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी, म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या मदतीने उभे केलेले स्वराज्य आणि मुघलांविरुद्ध दिलेला लढा या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.

रितेश देशमुख यांनी पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जब अंधेरा प्रकाश की तलाश में था, तब एक ज्वाला ने उभार लिया.” ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भव्य सादरीकरणामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

15 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

18 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

18 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago