मुंबई: छोट्या पडद्यावर सध्या मालिकांची स्पर्धा चांगलीच रंगली आहे. Zee Marathi आणि Star Pravah यांच्यात टीआरपीसाठी चुरस निर्माण झाली आहे. झी मराठीच्या मालिकांना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रवाहने आता नवा डाव टाकत ‘आनंदी’ ही नवीन मालिका जाहीर केली आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रोमोमधील वेगळेपणा काय?
‘आनंदी’च्या प्रोमोमध्ये तीन बहिणी पार्लरमध्ये दाखवल्या आहेत. मोठी बहीण खुर्चीत बसलेली असते, तर तिच्या दोन लहान बहिणी पार्लरवाल्याला तिच्या भुवया कोरायला सांगतात. काम पूर्ण झाल्यानंतर तिला आरसा दाखवण्यात येतो. मात्र दोन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते. त्यावर मोठी बहीण आत्मविश्वासाने “मी छान दिसतेय” असे म्हणते.
“तुला खरंच दिसतंय का?” असा प्रश्न विचारल्यानंतर प्रेक्षकांना समजते की ती अंध आहे. पुढील दृश्यात पैसे देताना ती अचूक नोट ओळखते आणि सुट्टे पैसे घेताना झालेली चूकही दाखवते. वाटेत चाफ्याच्या सुगंधाने थांबण्याचा प्रसंग तिच्या संवेदनशीलतेची जाणीव करून देतो. या दृश्यांमधून तिची आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि जगण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठळकपणे मांडण्यात आला आहे.
वेगळ्या कथानकाची उत्सुकता
मराठी मालिकांमध्ये अनेक विषय हाताळले गेले असले तरी अंध नायिकेच्या आयुष्याभोवती फिरणारी कथा क्वचितच पाहायला मिळाली आहे. त्यामुळे ‘आनंदी’ ही मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रसारणाबाबत उत्सुकता
‘आनंदी’ ही मालिका १६ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तिची नेमकी वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते ही मालिका संध्याकाळच्या स्लॉटमध्ये दाखवावी, अशी मागणी करत आहेत. काही प्रेक्षकांनी जुन्या मालिकांना निरोप देऊन नव्या मालिकांना संधी द्यावी, असे मतही व्यक्त केले आहे.टीआरपीच्या शर्यतीत आघाडी मिळवण्यासाठी स्टार प्रवाहचा हा नवा प्रयत्न कितपत यशस्वी ठरेल, आणि ‘आनंदी’ प्रेक्षकांच्या मनात किती घर करेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…
शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…