मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा आज (३ फेब्रुवारी) त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी रितेशने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करून पत्नीला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेश आणि जिनिलिया दोघेही त्यांच्या विनोदी आणि हटके सोशल मीडिया व्हिडिओंसाठी ओळखले जातात. लग्नाच्या या विशेष दिवशी रितेशने एक रील शेअर केली आहे, ज्यात तो “आगे है बरसात पीछे है तूफान” या गाण्यावर डबिंग करताना दिसतो, तर मागे जिनिलिया बसलेली आहे.
व्हिडिओसोबत रितेशने लिहिलंय
“लग्नाला १४ वर्षे झाली आहेत, हा वनवास कधीच संपू नये. वाढदिवसाच्या शुभेच्छा, बायको!”या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही कमेंट्समध्ये लिहिलं गेलं “लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी साहेब””तुम्हा दोघांवरही खूप प्रेम… तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”
१४ वर्षांचा सुखी संसार
रितेश आणि जिनिलिया यांनी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्नगाठ बांधली होती. दोघांनी मराठी आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. त्यांच्या प्रेमाची सुरुवात ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती आणि लग्नाआधी जवळपास १० वर्षे डेटिंग केले. या जोडप्याला दोन मुले आहेत – रियान आणि राहिल.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…