भविष्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मन प्रसन्न राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबात सुख शांती राहील. व्यवसायात अधिक मेहनत करावी लागेल. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल.

वृषभ: आत्मविश्वासात कमी जाणवेल. एखाद्या गोष्टीवरुन चिंता सतावेल. नोकरीची नवी संधी चालून येईल. व्यवसाय वाढीसाठी मित्राचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.

मिथुन: परिवारात धार्मिक कार्य होऊ शकतात. नोकरीत वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल, मात्र, कामाचा दबाव वाढेल. नोकरीची नवी संधी चालून येईल.

कर्क: उत्पन्नात वाढ होईल. अचानक धनलाभाचा योग आहे. स्वभावात चिडचिडपणा असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. लवकरच आनंदाची बातमी मिळेल.

सिंह: आत्मविश्वासात वाढ होईल. घरात लवकरच धार्मिक कार्य होतील. मित्रांच्या सहयोगाने रखडलेले काम मार्गी लागेल. उत्पन्नात वाढ होईल.

कन्या: व्यवसायात वाढ होईल. वडिलांचा चांगला आशीर्वाद मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीच्या ठिकाणी नवी संधी उपलब्ध होईल. अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल.

तूळ: व्यवसायात वाढ होईल. धावपळीचा दिवस असेल. मनात वेगवेगळ्या विषयांवरुन चिंता असेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरी निमित्त लवकरच इतरत्र प्रवास करण्याचा योग निर्माण होईल.

वृश्चिक: मन प्रसन्न राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. परदेशात जाण्याचा योग निर्माण होईल. आत्मविश्वासात कमी जाणवेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

धनु: नोकरीत अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक जीवन सुखमय असेल. आरोग्याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. अनियोजित खर्चात वाढ होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करा.

मकर: आत्मविश्वासात वाढ होईल. वाद-विवाद टाळा. व्यवसायात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. कुटुंबात जबाबदारी वाढू शकते. वडिलांचे चांगले सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ: मनात असंतोष असेल. नोकरीत परिवर्तन होऊ शकते. कामानिमित्त परिवारापासून दूर रहावे लागू शकते. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना नोकरीची नवी संधी उपलब्ध होईल.

मीन: लवकरच आनंदाची बातमी मीळेल. रखडलेले काम मार्गी लागेल. उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढल्याने संपत्ती खरेदी करण्याचा विचार कराल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

11 तास ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

17 तास ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

2 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

3 दिवस ago

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती ,…

3 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसीत कंपनीचे गोदाम जळून खाक

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील…

3 दिवस ago