भविष्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज रोजगारात कामातील योग्य बदल आकर्षक ठरतील. आपल्या कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल.  व्यापारात यश मिळणार आहे. संयमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. आपल्या पराक्रमामुळे समाजात व कुटुंबात आपली प्रतिष्ठा वाढणार आहे.

वृषभ: आज नोकरदारास स्नेहपूर्वक वातावरण अनुभवता येईल. आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला असेल. व्यापारिक प्रकरणात जबाबदारी वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नवीन संप्पत्ती खरेदीचा योग आहे. आर्थिक बाबतीत मध्यम स्वरुपाचा दिवस आहे. मित्रमैत्रिणीत आर्थिक व्यवहार टाळावेत. विद्यार्थ्यानी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. सामाजिक कार्यामुळे आपल्या नावलौकिकेत वाढ होईल. दिवसभरात आनंदी रहाल.

मिथुन: आजचा दिवस काही बाबतीत त्रासदायक आहे. ताणतणाव वाढल्याने मन व्यथित होईल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाव राहील. वाईट सवयीचा त्याग करा. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.

कर्क: आज दिवस उन्नतीकारक असणार आहे. मात्र आपणास कठोर भुमिकेत राहाव लागेल. वाईट सवयीचा त्याग करा. नोकरीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. मागील कामात विशेष यश मिळेल. मनोधैर्य वाढेल.

सिंह: आज दिनमान उत्कर्षकारक राहील. आपण केलेल्या कामाची सुरुवात चांगली होईल. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. अतिआत्मविश्वासाने निर्णय घेऊ नका. व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढणार आहे.

कन्या: आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. बढती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. परदेशगमनाचे योग आहेत. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल.

तूळ: आज अत्यंत लाभदायक दिनमान असेल. गृहस्थी सौख्य लाभेल. आपल्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा. नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढ़ती व बदली होण्याचे योग आहेत. व्यवसाय रोजगारात मोठेपणाच्या हवास्यापोटी होऊ घातलेला खर्च वाचवा. व्यापारात स्पर्धकांच्या चुकीचा नकळत फायदा होईल. व्यापारात वाढ होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. शासकीय योजनेतून लाभ घडेल. कौटुंबिक सौख्य राहिल. आरोग्य उत्तम राहणार आहे.

वृश्चिक: आज आपल्या कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीकडे वाटचाल कराल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात नवीन योजना कायदेशीर ठरतील. आर्थिक खर्चाचा ताळमेळ ठेवा. नोकरीत तणाव मुक्त झाल्याने मन समाधानी राहील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची आरोग्याची तक्रार निर्माण होईल. वैवाहिक जीवनात आंनदी वातावरण राहिल. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून लाभ होईल. अचानक लाभ होतील. प्रवास लाभकारी ठरतील.

धनु: आज आपणास नोकरीत तणावमय परिस्थिती उद्भभवण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक व्यवहारात सावध रहा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याना मोठ्या समस्या उद्‌भवतील. वाहन चालविताना खबरदारी घ्यावी. शक्यतो प्रवास टाळा. शत्रुपक्ष वरचढ होतील. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका.

मकर: आज नोकरीत जबाबदारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या पद्धतीत बदल केला तर फायदेशीर ठरणार आहे. व्यापारात आर्थिक स्थिती चांगला राहणार आहे. कार्यक्षेत्रात विस्तार वाढ होईल. उधारी वसुली होईल. नव्या संधीचा फायदा होईल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. प्रेमप्रकरणातील संबंध दृढ होतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. मित्रांकडून सहकार्य लाभेल.

कुंभ: आज आपल्या कार्यक्षेत्रात आपल्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. नवीन वस्तु खरेदीकडे मन झुकेल. आपल्या कार्यपद्धतीत बदल फायदा होईल. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. मुलाची प्रगती आपल्याला आनंद देईल. व्यापार रोजगारात अपेक्षे प्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील.

मीन: आज नोकरीत मान प्रतिष्ठा संभाळावी. आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ नये याची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर संपत्तीबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी होतील. त्यातून फायद्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

1 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

7 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

15 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

1 दिवस ago