भविष्य

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आपली आर्थिक स्थिती चांगली राहील. घर भाड्याची वसुली होईल. ग्रहांचे शुभ योग आपल्यासाठी अनुकूल ठरतील. मान, सन्मान प्राप्त होण्याचे संकेत. कर्जाचे व्यवहार लांबणीवर टाकावेत. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचे योग. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

वृषभ: कौटुंबिक निर्णयात द्विधा मनस्थितीत अडकाल. नवीन गुंतवणुकीसाठी योग्य काळ. आजचा दिनक्रम व्यस्त राहील. प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवसाच्या उत्तरार्धात मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल.

मिथुन: आपल्या बोलण्यामुळे लोकं आकर्षित होतील. चार लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळेल. सावधगिरी बाळगून व्यवहार करण्याचा दिवस आहे. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्यातील सहभाग वाढेल. धार्मिक कार्य आणि आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील.

कर्क: कुटुंब सौख्य चांगले लाभेल. हातात घेतलेली कामे सहजगत्या पूर्ण होतील. आजचा दिवस भाग्यकारक असेल. आपण घेत असलेल्या परिश्रमाचे उत्तम परिणाम दिसतील. मुलांबद्दलचा विश्वास आणखी दृढ होईल. लाभाच्या संधी प्राप्त होतील.

सिंह: विचारपूर्वक गुंतवणूक करा. मानसिक आरोग्याला जपा. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक विचलन आणि खिन्नता त्रस्त करण्याची शक्यता. कुटुंबातील सदस्यांचे संपूर्ण सहकार्य लाभेल.

कन्या: आपल्या कला कौशल्याची प्रशंसा केली जाईल. मुलांवर पैसे खर्च होतील. आजचा दिवस शुभ. निर्भिडपणे आणि साहसी धोरणाने हाती घेतलेली कामे पूर्ण कराल. कार्यालयातील सहकारी उत्तम साथ देतील.

तुळ: डोळ्यांच्या विकारापासून सावध राहा. ग्रह-नक्षत्रांची अनुकूलता भाग्याची भक्कम साथ प्राप्त करुन देईल. दुसऱ्यांची मदत करता करता आपलीही कामे पार पडतील. गुरुबद्दल संपूर्ण सन्मान आणि निष्ठा ठेवा. नवीन गुंतवणुकीसाठी शुभ दिवस. चांगल्या कामांत मन रमेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक: उधारी वसूल करण्यासाठी मागे लागा. आपल्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवतील. अनामिक भीती मनात घर करुन राहील. अपेक्षेप्रमाणे प्रयत्न यश देतील, असे नाही. मित्रांची चिंता सतावू शकेल. न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागू शकतील. मेहनत, परिश्रमाच्या जोरावर यशप्राप्ती होऊ शकेल.

धनु: गोड पदार्थांचे अतिसेवन टाळा. आपल्या अनुभवाचा लोकांना फायदा होईल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. परोपकारातून लाभ मिळतील. घरात शांतता नांदेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

मकर: घरामध्ये योग्य अशी खरेदी कराल. चिकाटीने अभ्यासात मन गुंतवा. मध्यम फलदायी दिवस. बहुमुल्य वस्तूची प्राप्ती होईल. अनावश्यक खर्च संभवतात. सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळतील. नोकरदार वर्ग आणि व्यापारी वर्गाला लाभकारक दिवस. प्रलंबित कामे मार्गी लागतील. नवीन गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस.

कुंभ: समाजात चांगली प्रतिष्ठा मिळेल. जुन्या नातेवाईक-मित्रांशी गप्पा होतील. बुद्धी आणि विवेकाने कार्यरत राहाल. आपले खर्च मर्यादित ठेवा. सावधगिरी व संयमाने व्यवहार करावेत. छोटे प्रवास संभवतात.

मीन: आपला दिवस मनासारखा जाईल. आपल्या धडपडीने कामे पूर्ण होतील. आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल असेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. कुटुंब आणि मित्रांची योग्य साथ लाभेल. आपला व्यवहार इतरांना आकर्षित करेल. कार्यालयात कौतुक केले जाईल. सामाजिक सन्मान प्राप्त होऊ शकतील. मनोबल वाढेल. दिवसाचा उत्तरार्ध हास्यविनोद, मौजमजेत जाईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago