चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाशी संबंधित शैक्षणिक सुविधा अधिक सुलभतेने आणि वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांची राज्यात चार विभागीय केंद्रे, तर विविध विद्यापीठांमध्ये आठ उपकेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ही केंद्रे तातडीने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
मंत्रालयात चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत विभागीय केंद्रे आणि उपकेंद्रांच्या स्थापनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षणाच्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, तसेच शैक्षणिक कामकाजासाठी दूरवर जाण्याची आवश्यकता कमी व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे चार विभागीय केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे उपकेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश
या केंद्रांच्या उभारणीसाठी संबंधित विद्यापीठांच्या कुलगुरू आणि कुलसचिवांनी आवश्यक जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. विभागीय केंद्रे आणि उपकेंद्रांच्या माध्यमातून राज्यातील तंत्रशिक्षणाचा विस्तार होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा अधिक सहज आणि वेळेत मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव अमोल मुत्याल, उपसचिव प्रताप लुबाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनोद मोहितकर, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…
महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…
मुंबई: महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात आज ऐतिहासिक नोंद झाली आहे. एकाच वेळी तब्बल १,४४० नवनियुक्त…
१३ दिवसांच्या आंदोलनानंतर दाखल गुन्ह्यांत न्यायालयीन दिलासा; अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन कायम शिरूर: पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय…
शिंदोडी (तेजस फडके) : शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याबरोबरच सहकार क्षेत्रात आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हतेचा आदर्श…