Categories: भविष्य

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

मेष: भाग्यवृद्धीमुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. भागीदारीपासून दूर रहा. अधिकार्‍यांशी वाद टाळल्यास व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करु शकाल. मनातील बोलल्याने संदिग्धता दूर होईल. घरातील लोक तुम्हाला खूप प्रेम देतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.

वृषभ: आज तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. घरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, नवीन घर घेण्याचा प्रयत्न करणार्‍यांना यश मिळू शकते. विवाहित लोकांचे घरगुती जीवन सामान्य राहील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. व्यावसायिक अडचण दूर होईल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. संपर्कातून आठवणींना उजाळा द्याल. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या.

​मिथुन: आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल. आज आपल्या वैयक्तिक कामात जास्त लक्ष द्यावे लागेल. करिअरमध्ये काही मोठे यश मिळण्याची चिन्हे आहेत. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरु करु शकता. अधिकार्‍यांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा आणि त्यांचा विरोध टाळा. घरातील कार्यालयीन काम करणाऱ्या लोकांमुळे वरिष्ठ आनंदी राहतील.  वाढत्या व्यापामुळे थकवा जाणवेल. आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल.

​कर्क: आजचा दिवस विशेषतः चांगला आहे. आज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगली पाहिजे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. घराबाहेर आनंदाचे वातावरण राहील. वरिष्ठांच्या रोषाला बळी पडू नका. थोडीफार कसरत करावी लागू शकते. घरात नातेवाईकांची ऊठबस राहील. तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

​सिंह: आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक बाबींसाठी दिवस शुभ आहे. व्यावसायिक कामात काही अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे तुमचे मन थोडे विचलित होऊ शकते. महिलांनी स्वयंपाकघरात काम करताना सावध राहावे. तुळशीच्या रोपात पाणी टाका, दिवस चांगला जाईल. तब्येत ठीक राहील. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. व्यावसायिक वाढीसाठी नवीन धोरण आखाल. तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल.

कन्या: परदेशात नोकरी करणार्‍यांसाठी आजचा दिवस फलदायी राहील. नवीन व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करु शकता. इतरांच्या चर्चेत येणे टाळा. जेवणाची विशेष काळजी घ्या. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही ठीक होईल. कामात चातुर्य दाखवावे लागेल. खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल. छानछोकीवर खर्च करावा लागेल. दिवस भटकंतीत घालवाल. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल. तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल. तसेच नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल.

तूळ: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन बदलांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल. व्यवसायाच्या क्षेत्रात इतर लोकांशी संपर्क साधणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वैवाहिक चर्चेत यश मिळेल. अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडा. मनोबल वाढवावे लागेल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. घरात भांडणे होण्याची शक्यता आहे.

​वृश्चिक: आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल. आई-वडिलांची साथ लाभेल. मार्केटिंग करणार्‍या लोकांना आज चांगली डील मिळू शकते. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर ताण येऊ देऊ नका. मुंगीला पीठ खायला द्या, मन प्रसन्न होईल. बौद्धिक क्षमतेचा कस लागू शकतो. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. हेकटपणे वागून चालणार नाही. आर्थिक व्यवहारात सजगता दाखवावी.

धनु: आज जी काही आश्वासने द्याल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिकांना लवकरच मोठे सौदे मिळू शकतात. आज उत्साहात पैसे खर्च करु नका. कामाच्या ठिकाणी बोलण्यावर संयम ठेवा. तुमचे जवळचे लोक तुमच्याशी दुरावू शकतात. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मानसिक संतुलन ठेवावे लागेल. कौटुंबिक गोष्टी येणार्‍या वेळेवर सोडाव्या. संपर्कातील लोक भेटतील. मनाची द्विधावस्था दूर ठेवा. घरातील मंडळींकडून कामाचे कौतुक केले जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यास वेळ मिळेल.

​मकर: तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या लक्ष्यावर ठेवा. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. तुमची बुद्धिमत्ता आणि कामावरील निष्ठेचे अधिकारी कौतुक करतील. कामाच्या ठिकाणी महिला सहकर्मचार्‍यांचा आदर करा. कुटुंबात कोणतेही शुभ कार्य होऊ शकते.सरळ मार्गी जमेल तेवढे करावे. मनातील इच्छेला प्राधान्य द्या. हातातील कामात यश येईल. नव्या उर्जेने कामे कराल.

​कुंभ: आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींकडे लक्ष द्या. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा. तुम्ही मुलांसोबत ऑनलाइन खरेदी करु शकता. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील, सावध राहा. एखाद्या कामात तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीची मदत घेऊ शकता. संमिश्रतेचा ताण कमी होईल. मत्सराला बळी पडू नका. आर्थिक व्यवहारात सावध रहा. उत्तम वाहन सौख्य मिळेल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी कराल.

मीन: आजचा दिवस योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीशील आणि मोठे बदल करण्यासाठी सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. तुमच्या वागण्यामुळे शेजारी तुमची प्रशंसा करतील. तुमची कार्यप्रवीणता वाढेल. जोमाने नवीन काम हातात घ्याल. परोपकाराची भावना जागृत ठेवाल. रागावर नियंत्रण ठेवा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

2 तास ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

12 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

13 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

17 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

17 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

17 तास ago