Categories: भविष्य

Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

​मेष: आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्या. आरोग्य उत्तम राहील आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे नवीन गोष्टी असतील ज्यामुळे तुमची सामाजिक स्थिती सुधारेल आणि तुमचे समाधान होईल. कुटुंबियांकडून शुभवार्ता मिळतील. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत घालवू शकता.

वृषभ: आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरु शकेल. कामाच्या ठिकाणी नवीन समीकरणांमुळे संपूर्ण वेळ व्यस्त राहतील. काही रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागतील. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते आणि इच्छित ठिकाणी बदली देखील शक्य आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांसोबत काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल.

मिथुन: आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरु करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरुही कराल. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे सरकारकडून लाभ मिळू शकतो. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे देऊ शकते. निरोगी पर्याय निवडल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील.

कर्क: भावंडांशी झालेल्या वादामुळे कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. प्रेमसंबंध तसेच राहतील. तुम्ही समर्पित मेहनतीने तुमच्या वरिष्ठांना संतुष्ट करु शकत असाल, तर तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. खाण्याकडे विशेष लक्ष द्या, त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा.

सिंह: घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करु नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा. आत्मविश्वास आणि धैर्य शिखरावर असेल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदार्‍याही मिळू शकतात. गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय सापडतील. कुटुंबातील तरुण मंडळी तुमच्या मदतीसाठी पुढे येतील.

​कन्या: घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. तुम्ही व्यवसायिक प्रकल्पांबद्दल उत्साही आणि आत्मविश्वासपूर्ण आहात, त्यामुळे तुम्ही भविष्यात पूर्ण यश मिळवू शकाल. कोणतीही कायदेशीर बाब प्रलंबित असेल तर ते न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश दर्शवेल. व्यापारी वर्गातील ग्राहकांशी पैशाबाबत वाद घालणे टाळा.

तूळ: व्यवसायाच्या संदर्भात नवीन व्यावसायिक संबंध आणि सौदे अंतिम करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. कामाशी संबंधित प्रवास येत्या काही महिन्यांत सकारात्मक परिणाम देईल. तुम्ही तुमच्या मैत्रिणीला रोमँटिक ठिकाणी घेऊन जाऊ शकता. तुमच्यापैकी काही महत्त्वाच्या लोकांशी संपर्क प्रस्थापित करून अधिक प्रभावशाली होतील. ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या.

​वृश्चिक: ​आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. आज व्यापार क्षेत्रात खूप चांगले परिणाम मिळतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क लाभदायक ठरेल. व्यवसायिकांना भागीदारीतून चांगला नफा मिळू शकतो. अधिकारी काम पाहून कौतुक करतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थितीही सुधारेल.

धनु: तुमच्या निर्णयांकडे योग्य लक्ष द्या. लालसेपोटी कोणतेही अवैध काम करु नका. कोणतीही गुंतवणूक करायची असल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे उचित ठरेल. व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल.

​मकर: व्यावसायिक संबंध आणि व्यवहारात प्रगती करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कामाशी संबंधित प्रवास येत्या काही महिन्यांत सकारात्मक परिणाम देईल. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्यापैकी काही प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित करु शकतात. प्रेमप्रकरणात तुम्ही भाग्यवान असाल.कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. घरातील सदस्यांचे सल्ले ऐका.

​कुंभ: गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. मानप्रतिष्ठा भंग पावेल.सध्याच्या परिस्थितीमुळे व्यावसायिक उपक्रम कमकुवत राहतील. हे देखील लक्षात ठेवा की तुम्ही नाराज आहात हे कोणालाही कळू देऊ नका.

मीन: आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होईल. व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक टाळावी. दिवस आनंदात जाईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

14 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

15 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago