मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात ६० टक्के पेरण्या पुर्ण, युरीयाची कृत्रिम टंचाई, तालुका कृषी आधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यात या वर्षी २४ जून पर्यंत सरासरी १२३ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या ६० टक्के एवढया पुर्ण झाल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पेरण्यांची टक्केवारी आणखी वाढणार आहे. बाजरी, मूग, उडीद, मका पिकासह २१०० हेक्टरवर उसाची लागवड तसेच सोयाबीनसह कापसालाही शेतकऱ्यांकडुन पसंती मिळाली आहे.

 

परंतु कृषी दुकानदार हे युरीया देताना लिकिंग खते देण्याची सक्ती करत आहे. याकडे कृषी आधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. क्वालिटी कंट्रोल व कृषी विभागातील अधिकारी व्हिजिट देवून वसुली करत असल्याची चर्चा बेट भागासह तालुकाभर होत आहे. त्यामुळे लिंकिंग खते न घेता युरीया मिळणार नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याचे दिसुन येत असुन कृषी विभाग स्वतःचे उखळ पांढरे करुन या लिकिंग खते कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

 

दरवर्षी शिरुर तालुक्यात जुन महिन्यात पावसाची सरसरी ९० मिमी एवढी असते. परंतु यावर्षीं मात्र सरासरी बाहुन १२३ मिमी पाऊस पडला असल्याचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी सांगितले. मागील वर्षी पावसाची सरासरी कमीच होती. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना फटका बसुन त्या ५८ टक्के एवढ्याच झाल्या.

 

परंतु या वर्षी मात्र पावसाची सरासरी जास्त असल्याने पेरण्यांची टक्केवारी वाढून ती ६० टक्के पेक्षा पुढे गेली आहे. २४ जून अखेर तालुक्यात बाजरी ६८४० हेक्टर, ५०७८ हेक्टर मूग, २२३ हेक्टर उडीद, ४२२ हेक्टर पेरणी झाली असून २१०० हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. तसेच २१०० हेक्टर सोयाबीन, ३०० हेक्टर कापूस यांचीही पेरणी करण्यात आली आहे. ३० जून अखेर खरीप हंगामातील पेरण्यांची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात २६ जून अखेर पाच गावांमध्ये अद्यापही पाण्याचे १७ टॅकर चालू असून दोन गावांतील पाण्याचे टॅकर बंद करण्यात आले आहेत.

 

यावर्षी सरासरी पाऊस चांगल्या प्रकारे पडलेला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांची आपल्या शेतात्त उत्कृष्ठ प्रकारच्या बियाणांची निवड पेरणी करावी. सध्या पावसाने उघडीप दिल्याने उर्वरीत पेरण्याही करुन घ्याव्यात, परिसरातील कृषी सेवकांचे मार्गदर्शन घ्यावे.

सिद्धेश ढवळे

(तालुका कृषी अधिकारी) शिरुर 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

11 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago