मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात दोन शिक्षकांची शिक्षणविस्तार अधिकाऱ्यास मारहाण; दोघांवरही निलंबनाची कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) १५ जुन २०२४ पासुन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने शाळा भेटीसाठी गेलेल्या शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांना दोघा शिक्षकांनी ‘तु आलास आता बस, तुला चहापाणी करतो. तुझा मोठा सत्कार करतो’ असे म्हणत संबंधित अधिकाऱ्याला मुख्याध्यापक कक्षात कोंडले. अधिकाऱ्याच्या पायावर पाय ठेवुन बळजबरीने खुर्चीत बसवले आणि अखेरीस त्यांचा मोबाईल हिसकावुन घेत त्यांना ‘तुला आता इथेच मारुन टाकतो,’ अशी धमकी देत बेदम मारहाण करून हाकलून दिल्याची घटना घडली आहे. गटविकास अधिकाऱ्यांनीया घटनेची दखल घेत तात्काळ महेश आनंदराव काळे व कैलास फक्कड पाचर्णे या दोन मारहाण करणाऱ्या शिक्षकांचे निलंबन केले आहे.

 

शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस केंद्रातील दत्तनगर जिल्हा परिषद शाळेत शुक्रवार (दि २८) रोजी हा प्रकार घडला असुन शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ बजाबा पवार यांनी दिलेल्या लेखी अहवालावरुन तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेल्या संभाषण व चित्रफितीच्या आधारे काळे व पाचर्णे या दोन शिक्षकांवर गटविकास अधिकारी महेश डोके यांनी मंगळवारी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकाराबाबत कमालीची गुप्तता बाळगल्याने या घटनेतील गुढ वाढले आहे.

 

तालुक्यातील शिक्षक संघटनांच्या दबावाच्या धोसऱ्याने प्रशासनाने; तर बदनामी टाळण्यासाठी शिक्षकवर्गातुन या घटनेबाबत कमालीचे मौन बाळगले जात आहे. विस्तार अधिकारी पवार यांनी पंचायत समितीला सादर केलेल्या अहवालानुसार,ते शुक्रवारी रांजणगाव सांडस केंद्रातील दत्तनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट व तपासणीसाठी गेले होते. त्यांनी शाळेत प्रवेश करताच महेश काळे व कैलास पाचर्णे या शिक्षकांनी त्यांना दमदाटी तसेच अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ सुरु केली.

 

त्यावेळी पवार यांनी शिक्षकांना समजावण्याचा प्रयत्न केला असता ‘चल तू आलाय ना, मग मुख्याध्यापकांच्या कक्षात बसु, तुला चहापाणी करतो, सत्कार करतो असे म्हणत या शिक्षकांनी त्यांना बळजबरीने मुख्याध्यापकांच्या कक्षात नेले, कक्षाचा दरवाजा लावुन घेत खुर्चीत पायावर पाय ठेवुन बसण्यास धमकावले. त्यामुळे भेदरलेल्या पवार यांनी मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करताच हे दोन शिक्षक आणखीच चिडले. मोबाईल हिसकावून घेत टेबलवर जोरात आपटला. त्यातूनही शांत न झालेल्या या शिक्षकांनी पवार यांना मारहाण,शिवीगाळ केली. ‘निघ इथून नाहीतर इथेच मारून टाकतो,’ अशी धमकी देत हाकलून दिले.

 

या प्रकाराने भेदरलेल्या पवार यांनी या घटनेबाबत पंचायत समितीकडे लेखी अह‌वाल सादर केला असुन मोबाईलमधील संभाषण चित्रफीतदेखील सादर केली आहे. गटविकास अधिकारी महेश डोके यांनी याबाबत गंभीर दखल घेत काळे व पाचर्णे या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असताना आणि सुरु झालेल्या शाळांना भेटी देऊन पाहणी करण्याच्या सुचना शिक्षणाधिका-यांनी केल्या असून त्यानुसार प्रत्येक शाळांना भेटी देऊन पाहणी करण्याची मोहीम पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत शुस केली आहे. त्याअंतर्गत पवार हे शाळा तपासणीसाठी गेले असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.

 

शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ पवार हे प्रथमच दत्तनगर येथे शाळा भेटीसाठी गेले होते. त्यांची पार्श्वभूमी त्रास देण्याची नाही. तरीही हा प्रकार घडल्याने त्याची गंभीर दखल घेतली आहे. पवार यांनी लेखी अहवालासोबत मोबाईलमधील संभाषण व चित्रफीत सादर केली असून चित्रफितीचे अवलोकन करता या शिक्षकांची त्यांच्यासोबतची वागणूक कशी असेल याचा स्पष्ट अंदाज येतो. संबंधित शिक्षकांची व्हिडिओतील वाक्ये देखील आक्षेपार्ह असल्याने संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

महेश डोके (गटविकास अधिकारी)

पंचायत समिती, शिरुर 

शिरुर तालुक्यात भाषणबाजीत महिला आघाडीवर; महिलांच्या शुभाशिर्वादाने एक आगळावेगळा शुभविवाह संपन्न

शिरुर तालुक्यात कैलासराव बोंबे यांच्याकडून सेवापूर्तीवेळी विद्यालयास देणगी, समाजापुढे उभा केला आदर्श

शिरुरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई, मलठण परिसरात एका रात्रीत फोडली पाच घरे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

10 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

10 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago