महाराष्ट्र

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

मुंबईः कारखान्यासाठी कर्ज डावल्याने अशोक पवार यांनी अजित पवार यांना चॅलेंज केले आहे. ‘एनएसडीसी’कडे (NSDC) सादर केलेल्या कर्जाच्या फाईल मध्ये त्रुटी असतील तर संबंधितांनी दाखवाव्यात. माझी कर्जाची फाईल 100% बरोबर आहे. मी समोरासमोर बसून चर्चा करेन, असे आव्हान अशोक पवार यांनी अजित पवार यांना दिले आहे.

मी शरद पवार यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणार असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दात अशोक पवार यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली. केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील १३ कारखान्यांना एनएसडीसीकडून कारखान्यांना 1800 कोटींहून अधिक मर्जीचे कर्ज देण्यात आले होते. यामध्ये विरोधी पक्षात असणाऱ्या कारखान्यांना कर्ज डावलले गेल्याचा आरोप होत असून पुण्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विकासाच्या नावाखाली तुम्ही सतत पक्ष बदलणार असाल आणि केवळ मी शरद पवार यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणारा असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. मी कारखान्याचा प्रमुख असलो तरी त्याचा सभासद शेतकरी आहेत. 25 मे ट्रॅक्टर ऊस सध्या पडून आहे. त्यांची नाराजी सरकार विरोधात वाढल्याशिवाय राहणार नाही. अशी अडवणूक होत असेल तर आंदोलन करू, असा इशाराही अशोक पवार यांनी दिला आहे.

विरोधी पक्षात आहे म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी आहे. आता आमदार म्हणून मी त्यांच्यासोबत नाही म्हणून मलाही निधी दिला गेला नाही. अशोक पवार, राहुल जगताप हे कारखान्याचे अध्यक्ष असले तरी कारखाना हा शेतकऱ्यांचा असतो. त्यांना मदत होणं गरजेचे आहे. अशाप्रकारे अडवणूक करणे योग्य नाही. मकरंद पाटील शरद पवार यांच्यासोबत होते त्यावेळी त्यांच्या कारखान्यांना पैसे दिले नाहीत आता अजित पवार यांच्यासोबत आल्यानंतर त्यांना तब्बल 500 कोटी रुपये दिले आहेत. नवाब मलिक आता त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे त्यावर ते बोलणार नाहीत, असेही अशोक पवारांनी सांगितले.

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

शिरुर तालुक्यात रवी काळेंनी अशोक पवारांची साथ सोडल्याने राजकीय वातावरण तापले

कारेगाव मध्ये सगळे दिग्गज एकत्र असुनही अशोक पवार यांचे कट्टर समर्थक राहुल गवारे यांची एकाकी लढत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

15 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

15 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

15 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago