मुख्य बातम्या

शिक्रापुरात पुणे नगर महामार्गावरील पुलावरुन पिकअप कोसळली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत बजरंगवाडी येथील ओढ्याच्या पुलावरून एक मालवाहू पिकअप वाहन रात्रीच्या सुमारास पुलावरुन खाली पाण्यात कोसळल्याची घटना घडली असून सुदैवाने चालक सुखरुप बाहेर निघाल्याने दुर्घटना टळली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन एम एच १२ टी व्ही १२७६ या पिक अप वरील चालक पिकअप मध्ये कोंबड खताच्या पिशव्या घेऊन पुणे बाजूने अहमदनगर बाजूकडे जात असताना पाठीमागून आलेल्या वाहनाने कट मारल्याने चालकाचा पिकअप वरील ताबा सुटून पिकअप चक्क येथील ओढ्याच्या पुलावरुन खाली कोसळली. यावेळी पिकअप वरील चालक धाडसाने पिकअप मधून बाहेर आल्याने दुर्घटना घडली.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, पोलीस नाईक आत्माराम तळोले, राकेश मळेकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने पुलाखाली पाण्यात कोसळलेली पिकअप पाण्याबाहेर काढली. घडलेल्या घटनेत पिकअपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये पिकअप चालक हा किरकोळ जखमी झाला असून त्याचे nav समजू शकले नाही. मात्र गंभीर प्रकार घडून देखील सुदैवाने दुर्घटना टळली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

20 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago