मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील महिला वस्ती गृहांचे सुरक्षा ऑडीट व तपासणी करा अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

शिरुर (तेजस फडके): नुकतीच महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातील सावित्रीबाई फुले शासकीय महिला वस्ती गृहामध्ये एका मुलीचा बलात्कार करुन खून झाल्याची घटना घडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहे तसेच खासगी महिला वस्तीगृहे या मध्ये नियमानुसार सी सी टी वी, महिला सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी आणि स्थानिक पोलीस स्टेशन चा नंबर असणे आवश्यक झालेले आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातील सर्व शासकीय आणि खासगी महिला वस्तीगृहांचे सुरक्षा ऑडीट करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के आणि शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पाचंगे, पुणे जिल्हाध्यक्ष शैलजा दुर्गे, पुणे जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंडे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश शिंदे, युवक मराठा महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक शेळके, सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डीले, वंदना पोटे यावेळी उपस्थित होते.

शिरुर तालुका शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात महिलांसाठी व मुलींसाठी सुरक्षित आहे हे समाजापुढे आले पाहिजे. त्यामुळे महिला किंवा मुलींच्या बाबत एखादा गैरप्रकार किंवा दुर्घटना घडण्या आधीच महिला व युवती सुरक्षितते बाबत शिरुर तालुका प्रशासन सक्रीय आहे असा संदेश राज्यात जाणार आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातील सर्व शासकीय आणि खासगी महिला वस्तीगृहांचे सुरक्षा ऑडीट करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आल्याचे पुणे जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंडे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

16 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

22 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

22 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

23 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

23 तास ago