मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने विद्युत तारा व खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

शिरुर (तेजस फडके): शिरुर परीसरात काल गुरुवार (दि. 8) रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. सोने सांगवी, ढोकसांगवी, रांजणगाव, कारेगाव, फलके मळा, करंजावणे, गणेगाव परिसरात पावसाबरोबरचं वाऱ्यांचा जोर खुप होता.

याबाबत कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सांगितले की विजेचे खांब पडल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. शिरुर तालुक्यात सूरु असलेल्या वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे विजेचे खांब मोडुन तसेच ट्रान्सफॉर्मर जळुन संपुर्ण विज पुरवठा खंडीत व विस्कळीत झाला असून महावितरणचे नुकसान झाल्याची माहिती सहायक अभियंता दीपक पाचुंदकर यांनी दिली.

MIDC रांजणगाव मध्ये सुद्धा लाईन वर झाडे पडली असून विजपुरवठा विस्कळीत झाला आहे, असे रामेश्वर ढाकणे यांनी माहिती दिली. तालुक्यात वादळी वाऱ्याने धुमाकुळ घातला असून विजेचा कडकडाट ही मोठया प्रमाणात वाढला होता. दुपारी चार वाजल्यापासुन वादळी वाऱ्याला सुरवात झाली होती. त्याचबरोबर विजेचा कडकडाट वाढल्याने सर्व सामान्य नागरिकांत घबराट पसरली आहे.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव, कारेगाव, कोंढापुरी, ढोकसागवी सोनेसांगवी या परिसरातील उच्चदाब वाहिनीचे 25 व लघुदाब वाहिनीचे 40 सिमेंट चे खांब मोडले आहेत. तर विज पडुन ट्रान्सफॉर्मर जळाले असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. वरिष्ठांकडे खांबांची मागणी केली आहे. मात्र ते येईपर्यंत पडलेल्या खांबा पैकीच जे खांब चांगले आहेत यांची तपासणी करुन ते उभा करुन विद्युत पुरवठा सुरु करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यासाठी गँग व जनमीत्र कार्यरत आहेत. जो भाग विद्युत पुरवठ्यापासुन पुर्ण वंचित आहे. त्या भागातील विद्युत पुरवठा सुरु करण्याचे काम सुरु आहे. खंडीत व विस्कळीत विजपुरवठ्या मुळे अनेक गावात रात्री उशीरा पर्यत अंधार होता. नागरीकांनी विज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु असुन नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

3 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago