रांजणगाव गणपती (तेजस फडके): वाघाळे (ता. शिरुर) येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत बढे तर उपाध्यक्षपदी विकास कारकूड यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन यापूर्वीचे अध्यक्ष दिलीप थोरात तसेच उपाध्यक्ष विश्वनाथ कारकूड आपल्या पदांचा रजिनामा दिल्याने गुरुवार (दि 8) जुन रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी निवडणुक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी सूर्यकांत बढे तर उपाध्यक्ष पदासाठी विकास कारकूड यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधीकारी ए एच धायगुडे यांनी या दोंघाची बिनविरोध निवड केली.
वाघाळे गावाच्या इतिहासात प्रथमच एका शिक्षकाला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संधी मिळाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. यावेळी गावचे उपसरपंच दादा सोनवणे, माजी सरपंच तुकाराम भोसले, बाळासाहेब शेळके, अशोक सोनवणे, बाळासाहेब थोरात, देवराम थोरात, अरुण बढे, दत्तात्रय गायकवाड, एकनाथ डफळ, पप्पू भोसले, रामदास थोरात, दत्तात्रय बढे, संतोष गावडे, पांडुरंग घोलप, जयेंद्र सोनवणे तसेच सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप थोरात यांनी तर बाळासाहेब शेळके यांनी आभार मानले.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…