मुख्य बातम्या

श्रीगोंदा तालुक्यात वाळुमाफियावर हल्ला; वाळु माफिया गंभीर जखमी

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत हिस्सा मागण्याच्या कारणावरुन रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली असुन या जखमी वाळुमाफियावर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याचे बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांनी सांगितले.

 

याबाबत सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माठ, म्हसे परीसरातील घोडधरणात पात्रात सुरु असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत हिस्सा पाहिजे म्हणून म्हसे परिसरातील तीन ते चार जणांचे वाळु माफियासोबत पिंपरी कोलंदर परिसरात दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास वाद सुरु झाले होते. या वादाचे पर्यवसान भांडणात होऊन तीन ते चार जणांनी वाळू तस्करावर धारदार शस्त्राने हल्ला केला.

 

या हल्ल्यात केलेला वार वाळु माफियाच्या कंबरेवर बसला. त्यानंतर वाळु तस्कराने तेथून पळ काढल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यानंतर जखमी झालेल्या वाळु माफियावर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी बेलवंडी पोलिस स्टेशन येथे अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकाराने परीसरात खळबळ उडाली असुन वाळु उपशावरुन वाळु माफियामध्ये अनेकवेळा वाद होत असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

 

पिंपरी कोलंदर येथे घडलेल्या घटनेची माहिती मिळाली असुन मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने मी नगर येथे बंदोबस्तावर होतो. या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नाही.

संतोष भंडारे

पोलिस निरीक्षक

(बेलवंडी पोलिस स्टेशन)  

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

5 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

9 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

9 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago