आरोग्य

सैंधव मिठाचे फायदे

मिठा शिवाय जेवणाला अर्थ नसतो. परंतु पांढऱ्या मिठाच्या अति सेवनाने अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे काळ्या मीठाचे सेवन हे उपयुक्त ठरते. यात सोडियम, क्लोराइड, आयरन, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे डायजेशन, ब्लड प्रेशर आणि एनीमिया दूर करण्यास मदत करते. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात. सामान्य मीठ हे समुद्रापासून मिळते आणि शेंदेलोण (सैंधव) व पादेलोण (काळं मीठ) ही खनिज मिठ आहेत. मिठाचे खडक फोडून, चूर्ण करून ती बनवलेली असतात. त्यामध्ये सोडिअम क्लोराईड शिवाय अत्यंत अल्प प्रमाणात मॅग्नेशिअम व कॅल्शिअम यांची संयुगं असतात.

फायदे

1) सैंधव मीठामुळे हाय ब्लडप्रेशर कंट्रोल करण्यास मदत होते. तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.

२) तणाव कमी करण्यासाठी सैंधव मीठाचे सेवन फायदेशीर ठरते. सैंधव मीठ सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्स बॅलन्स राखण्याचे काम करते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

३) पित्त झाल्यावर आलं, लिंबू आणि सैंधव मिठाचे चाटण थोडं थोडं खाल्यास पित्ता मुळे आणि इतर कारणा मुळे होणारी उलटी थांबते.

४) अंगदुखी कमी करण्यासही सैंधव मिठाचा वापर होतो.

५) सायनसचा त्रास असलेल्यांनी सैंधव मीठाचे सेवन करणे गरजेचे असते. मुतखड्याचा त्रास असल्यास सैंधव मीठ आणि लिंबू पाण्यात मिक्स करुन प्यायल्यास काही दिवसांत फरक पडतो.

६) अस्थमा, डायबेटीज आणि आर्थराइटिसच्या रुग्णांनी नियमितपणे सैंधव मिठाचे सेवन करावे.

७) कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे याच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

८) आयरनचे प्रमाण जास्त असते जे आरोग्यास उपयुक्त असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

6 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

10 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

10 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago