मुख्य बातम्या

बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंडतर्फे नाथाभाऊ शेवाळे यांचा सर्वोच्च सन्मान!

कारेगाव (तेजस फडके): जनता दल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या महाराष्ट्रातील आजवरच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड यांच्यातर्फे त्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. भारताचे माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा जी यांच्या प्रमुख उपस्थितीत व KAMKUS, London चे संस्थापक प्रोफेसर डॉ. दिवाकर सुकुल यांच्या हस्ते दिल्ली येथे त्यांना सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स देऊन गौरविण्यात आले.

त्यांचे नेतृत्वगुण तसेच महाराष्ट्रातील लोकांसाठी समर्पित वृत्तीने, तत्वनिष्ठ राहून त्यांनी आजवर केलेलं काम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. या शब्दात ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांचा गौरव केला आहे.

ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड या आंतरराष्ट्रीय संस्थेने माझ्या कामाची दखल घेऊन मला सन्मानित केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार! भारताचे माजी पंतप्रधान, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा जी यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली मी आजवर काम करत आलो. इथून पुढेही करत राहीन. या सन्मानानंतर माझी जबादारी आणखी वाढल्याचे मला भान आहे. यामुळे मिळालेली प्रचंड ऊर्जा घेऊन जनसामान्यांच्या हितासाठी मी आणखी जोमाने काम करत राहीन.

नाथाभाऊ शेवाळे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

38 मिनिटे ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

22 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago