मुख्य बातम्या

पुणे-नगर महामार्गावरील ५६ किमी उड्डाणपुलाचा मार्गामध्ये पुन्हा बदल…

पुणे: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि पाणीटंचाईसारख्या समस्यांचा अखेर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरून गांभीर्याने विचार झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत.

मूळ नियोजनानुसार पुणे-शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला ५६ किमी लांबीचा दुमजली उड्डाणपूल वाघोली येथून सुरू होणार होता. मात्र अजित पवार यांच्या आदेशानुसार हा पूल आता विमाननगरमधील फिनिक्स मॉलपासून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे विमाननगर, खराडी, वडगाव शेरी या वाहतूकदृष्ट्या अति बोझ पडलेल्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. फिनिक्स मॉलपासून सुरू झाल्यास वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच वेळेचीही बचत होणार आहे.

शिवाय, पुणे-नगर रस्त्यावरील सोमनाथनगर चौक ते खराडी बायपास चौक दरम्यान धोकादायक बीआरटी मार्गिका अपघातांना कारणीभूत ठरत होती. माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या मागणीवरून अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना ही मार्गिका तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे स्थानिक रहिवासी आणि प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

वडगाव शेरी, गणेशनगर, खराडी, विमाननगरसारख्या भागांतील पाणीटंचाई हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न होता. यावर अजित पवार यांनी स्पष्ट सूचना देत महापालिकेच्या टँकर सेवेला अधिक सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना पुरवले जाणारे टँकर हे विनाशुल्क असतील, हे स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे खासगी टँकरवाल्यांच्या मनमानी दरांवर आळा बसेल.

येरवडा येथील म्हाडा पुनर्विकास प्रकल्प रखडलेला असून त्याच्या परवानग्यांवर काम लांबले होते. या प्रकल्पास गती देण्यासाठी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना संबंधित परवानग्या त्वरीत मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे रहिवाशांना नवीन घरांचा मार्ग मोकळा होणार आहे.

पुणे-शिरूर महामार्ग खरंच होणार कोंडीमुक्त; तीन मजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून…

पुणे आणि शिरूरचा सहा पदरी उड्डाण मार्गाला जोडला जणार समृद्धी महामार्ग; कोठून पाहा…

पुणे-शिरूर सहापदरी कॉरिडोर प्रकल्पाबाबत मोठी माहिती…

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी फुटणार; दुमजली उड्डाणपूलासह…

रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) पर्यंत मेट्रो; वाहतूक कोंडी सुटणार…

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी सुटणार; मिळणार नवीन मार्ग…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

2 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

5 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

7 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago