कारेगाव (तेजस फडके): जनता दल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मपीठ यांच्यातर्फे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील आजवरच्या कार्यासाठी अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. वाय. बी. चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी तेलंगणाचे राज्यपाल महामहीम मा. श्री. जिष्णु देव वर्मा जी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. राम शिंदे जी (सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद), डॉ. मुरहरी केळे जी (ज्येष्ठ साहित्यिक, मा. अध्यक्ष, त्रिपुरा राज्य विद्युत मंडळ), आसिफ भामला जी (अध्यक्ष – भामला फाउंडेशन, मुंबई), सागर धापटे पाटील (आयोजक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार समिती) आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रजेला सुखी करणं हाच राजधर्म मानणाऱ्या मायाळू तरीही कर्तव्यकठोर अशा धुरंधर आणि पराक्रमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कारित होणे, हे मी माझं मोठं सदभाग्य समजतो. आयुष्यभर आपण ज्या समाजसुधारकांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे, ही मला आजवर मिळालेली सर्वात मोठी पोचपावती आहे.
नाथाभाऊ शेवाळे
प्रदेशाध्यक्ष- जनता दल सेक्युलर, महाराष्ट्र
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…