मुख्य बातम्या

ब्रेकिंग; पत्रकार असल्याचे सांगुन खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवत खंडणीची मागणी, दोन जणांना अटक

कारेगाव (तेजस फडके) मुलीच्या छेडछाडीच्या आणि चोरीच्या खोट्या गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवुन २५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन आरोपींना रांजणगाव MIDC पोलीसांनी अटक केली असुन १) सुमित लक्ष्मण थोरात (वय ३२), २) विशाल नवनाथ ढेसले (वय ३१) रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर, जि. पुणे अशी त्यांची नावे आहेत.

 

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि १ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ ते ८:३० वाजण्याच्या सुमारास रांजणगाव गणपती-भांबार्डे रोडलगत असलेल्या बिल्डींगमध्ये फिर्यादी श्रीकांत तुकाराम शिंपले (वय २५) मुळ रा. कुंबेफळ, ता. आंबेजोगाई, जि. बीड सध्या रा. रांजणगाव गणपती, संकल्पसिटी, ता. शिरुर, जि. पुणे यास आरोपी सुमित लक्ष्मण थोरात व प्रविण जगताप यांनी प्लंबिंगचे कामासाठी बोलावुन घेवुन काठीने मारहाण केली आणि त्या ठिकाणी एका मुलीस बोलावुन घेवुन तु हिची छेडछाड करुन तिचा मोबाईल व पैशाची चोरी केली असल्याचा तुझ्यावर गुन्हा दाखल करुन तुला खोट्या गुन्हयात अडवितो अशी धमकी देवुन २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

 

त्यानंतर त्याच्याकडील मोबाईलमधील स्कॅनरवरती खंडणीची रक्कम फिर्यादीस पाठविण्यास सांगीतली. सदरची खंडणी स्वरुपात घेतलेली रक्कम त्याचे साथीदार आरोपी विशाल नवनाथ देसले व अभय रामटेके सर्व (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांचे मदतीने संगनमत करुन घेतली आहे.याप्रकरणी श्रीकांत शिंपले याच्या तक्रारीवरुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदर गुन्ह्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना समजताच त्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत तात्काळ तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. तपास पथकाने घडलेल्या प्रकाराबाबत सत्यता पडताळून आरोपीचा सहभाग निष्पन्न करुन आरोपी नामे १) सुमित लक्ष्मण थोरात, २) विशाल नवनाथ ढेसले यांना दि ३ सप्टेंबर २०२३ रोजी २:३० वाजता अटक करण्यात आलेली असुन त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता. शिरुर न्यायालयाने आरोपीना दि ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

 

तपास पथकाने अटक केलेल्या आरोपीकडुन खंडणी स्वरुपामध्ये फिर्यादी कडुन घेतलेली २५ हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच आरोपी प्रविण जगताप आणि अभय रामटेके यांचा शोध घेवुन त्यांचा गुन्हयातील सहभागाबाबत खात्री करुन पुढील अधिक तपास करण्यात येत आहे.

 

पत्रकार असल्याचे सांगत उकळली खंडणी….
यातील अटक आरोपी सुमित लक्ष्मण थोरात हा रांजणगाव गणपती येथील स्थानिक रहिवाशी असुन त्याने स्वतःला पत्रकार असल्याचे तसेच त्याच्या पोलीसांशी ओळखी आहेत असे फिर्यादीस सांगुन त्यास विनयभंगाच्या खोट्या केसमध्ये अडकविण्यांची भिती दाखवत खंडणीची मागणी करत २५ हजार रुपये खंडणी घेतली आहे. त्याने अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता असुन त्याबाबत रांजणगाव MIDC पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

सदरची पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख पुण्याचे अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार सुभाष गारे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, तेजस रासकर, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, चालक पोलिस हवालदार पांडुरंग साबळे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे हे करत आहेत.

शिक्रापुर वनपालांचा अजब कारभार, बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कालवडीचा पंचनामा करण्यासाठी रेक्यु टिमला आदेश…?

शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल

शिरुर ST बस स्थानकातील अस्वच्छ शौचालयाबाबत रामलिंग महिला उन्नतीचे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

12 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

20 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago