शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिरुर येथील ST आगारातील सुलभ शौचालय महिलांसाठी मोफत करावे तसेच शौचालयच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याची नेमणुक करावी. याबाबत कोणतीच सुधारणा न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करण्याबाबत शिरुर येथील ST चे आगार व्यवस्थापक, शिरुर पोलीस स्टेशन, शिरुरचे तहसीलदार यांना संस्थेच्या वतीने अध्यक्षा राणी कर्डीले यांनी निवेदन दिले.
रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, गेल्या अनेक दिवसांपासुन शिरुर येथील एस टी आगारातील महिलांच्या शौचालयात महिलांची कुचंबना होत असुन महिलांकडुन लघवीला जाण्यासाठी स्वच्छतेच्या नावाखाली पैसे घेतले जात आहेत. तसेच महिलांच्या शौचालयाबाहेर पुरुष बसविला जात असुन हि निंदनीय बाब आहे.
याबाबत रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने यावर काही दिवसांपुर्वी आवाज उठविला होता. त्यावेळी संबंधित ठेकेदाराने शौचालयात जाण्यासाठी महिलांकडुन कसलेही पैसे घेतले जाणार नाही. तसेच शौचालयाची वारंवार स्वच्छता केली जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु काही दिवसानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ च झालेली आहे.
तसेच महिलांच्या शौचालयाबाहेर एक वृद्ध व्यक्ती नेमलेला असुन महिला शौचालयात गेल्यानंतर तो त्यांची अडवणुक करुन पैसे घेतो आणि पैसे देण्यास नकार दिल्यास महिलांशी असभ्य वर्तन करतो. हा प्रकार त्वरित थांबवावा आणि संबंधित ठेकेदाराला योग्य ती समज द्यावी. अन्यथा रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ६ सप्टेंबर २०२४ या दिवशी शिरुर एस टी आगारात लोकशाही मार्गाने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहे.
संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे
१) सुलभ शौचालय महिलांसाठी पुर्णपणे मोफत करावे.
२) शौचालायची रोजच्या रोज स्वच्छता ठेवावी.
३) महिला शौचालयाच्या ठिकाणी महिला कर्मचारी नेमावी.
४) शौचालयात येणाऱ्या महिलांना सभ्यतेची वागणूक द्यावी.
५) सुलभ शौचालय बाहेर महिलांसाठी मोफत शौचालय अशा आशयाचा मोठा बोर्ड लावावा.
या प्रमुख मागण्या निवेदनात मांडलेल्या आहेत.
मांडवगण फराटा इथं किरकोळ कारणावरुन जेष्ठ महिलेला शिवीगाळ व मारहाण करत दिली जिवे मारण्याची धमकी
शिरुर तालुक्यातील पारोडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता