मुख्य बातम्या

शिक्रापुर वनपालांचा अजब कारभार, बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कालवडीचा पंचनामा करण्यासाठी रेस्क्यू टिमला आदेश…?

शिरुर (तेजस फडके) निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील एका शेतकऱ्याच्या पाळीव कालवडीचा पहाटेच्या वेळी बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडला. याबाबतची माहिती शिक्रापुरच्या वनपाल गौरी हिंगणे यांना मिळताच वनरक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या कालवडीचा रेस्क्यू टिमने तातडीने पंचनामा केल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे रेस्क्यू टिमला असा पंचनामा करण्याचे अधिकार आहेत का…? याबाबत शिरुर तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

 

विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या मध्ये रेस्क्यू टीमचे पंचनामा करतानाचे फोटो छापुन आले आहेत. पंचनामा करत असताना वनपाल गौरी हिंगणे आणि वनरक्षक प्रमोद पाटील हे फोटोत उपस्थित दिसत नाहीत. पंचनामा करतेवेळी गौरी हिंगणे व प्रमोद पाटील हे घटनास्थळी उपस्थित नव्हते, काही ग्रामस्थ व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. मग हे अधिकारी अदृश्य पध्दतीने रेस्क्यू टिमला मार्गदर्शन करत होते का…? कि फोनद्वारे मार्गदर्शन करत होते का…? तसेच कालवडीचा पंचनामा करण्यासाठी रेस्क्यू टिमची नेमणुक कोणाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. याबाबत शिरुर तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरु आहे.

 

रेस्क्यू टिम म्हणजे नक्की काय…?

रेस्क्यू टिम म्हणजे स्वयंस्फूर्तीने काही तरुण पुढे येऊन वनखात्याला मदत करतात. जसे की बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा उचलण्यासाठी मदत करने, वन्यप्राण्यांच्या संदर्भात काही घटना घडली. तर वन अधिकारी यांच्या समवेत जाऊन मदत करणे. रेस्क्यू टिम मधील तरुणांना वनविभागाने तशी ओळखपत्र आणि गणवेश पण दिला आहे. परंतु या टिम मधील सदस्य शासकीय कर्मचारी नाहीत. तसेच त्यांना कुठलाही पंचनामा करण्याचा अथवा रिपोर्ट तयार करण्याचा, अहवाल पाठविण्याचा अधिकारही नाही अशी माहिती शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली.

 

रेस्क्यू टिमच्या सदस्यांचे नको ते उद्योग…

शिरुर तालुक्यातील वनविभागाच्या रेस्क्यू टिम मधील काही सदस्य वनविभागाच्या अंबर दिव्याच्या गाडीत बसुन गाडी चालवतानाचा फोटो स्वतःच्या मोबाईलच्या डिपी ला ठेऊन स्वतः शासकीय वनविभाचा अधिकारी आहे असे भासवुन तालुक्यात जनमानसात तशी प्रतीमा तयार करत आहे. तसेच आपणच शिरुर तालुक्यात फार मोठे सर्पमित्र आणि प्राणीमित्र आहोत असे भासवत आहेत. त्यामुळे याबाबत वनविभागाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी काही जागरुक नागरिकांनी केली आहे.

 

शिक्रापुरच्या वनपाल यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह…?
शिक्रापुरच्या वनपाल गौरी हिंगणे यांच्या कार्यक्षेत्रात यापुर्वीही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या इतरही अनेक जनावरांचे पंचनामे रेस्क्यू टिमने केल्याचीही दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे. शिक्रापुर वनहद्दीत अनेक कोळशाच्या भटया होत्या व सध्याही आहेत. तसेच शिक्रापुर वनपाल गौरी हिंगणे यांच्या कार्याक्षेत वनविभागाच्या हद्दीतीत आलेगाव पागा आणि उरळगाव येथे राखीव वनहद्दीत जेसीबीच्या साह्याने झाडे काढुन टाकली. तसेच वनहद्दीतील शेकडो ब्रास माती हायवा ट्रकच्या साह्याने गौण खनिज माफीयांनी वनपाल गौरी हिंगणे यांच्याशी संगनमत करुन वाहुन नेली. याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वनविभागाने उशीरा गुन्हा दाखल केला आहे. मुरुम व माती चोरीच्या वृत्तपत्रात बातम्याच प्रसिद्ध झाल्या नसत्या तर त्याबाबत गुन्हा दाखल केलाच नसता. तसेच गुन्हा दाखल होऊन सुद्धा गुन्हयात वापरलेली संपुर्ण यंत्र सामुग्री गौरी हिंगणे यांनी जप्त केली नाही. तसेच गुन्हयातील सर्व आरोपींना अटकही केलेली नाही.

(क्रमशः)

 

वरील विषयाच्या अनुषंगाने शिक्रापूर वनपाल गौरी हिंगणे व तळेगाव ढमढेरे चे वनरक्षक प्रमोद पाटील यांची सखोल चौकशी करण्यात येईल व त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.

प्रताप जगताप

शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरुर 

शिरुर शहरातुन दोन महिला बेपत्ता; पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल

शिरुर संवादिनी तर्फे डेक्कन एज्युकेशन सोसायटी शाळेत ओळख स्पर्शाची हा स्तुत्य उपक्रम

शिरुर ST बस स्थानकातील अस्वच्छ शौचालयाबाबत रामलिंग महिला उन्नतीचे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

2 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

2 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

2 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

2 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

4 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

5 तास ago