शिक्रापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र क्राईम न्यूज साप्ताहिकाच्या संपादकावर गुन्हा
शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील दलित महिलांबाबत अश्लील भाषा वापरत महिलांबाबत लज्जास्पद तसेच महिलांची बदनामी आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वृत्त छापल्या प्रकरणी महाराष्ट्र क्राईम न्यूज चे संपादक एकनाथ शिवराम अडसूळ यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढापुरी (ता. शिरुर) येथील भूषण गायकवाड यांच्या मोबाईलवर नुकतीच महाराष्ट्र क्राईम न्यूजचे संपादक एकनाथ अडसूळ यांच्या प्रकाशित झालेल्या साप्ताहिक अंकाची प्रत आली. त्यामध्ये त्यांनी कोंढापुरीत उदरनिर्वाहासाठी आलेल्यांकडून गुंडागिरी व लुटमार या मथळ्याखाली बातमी छापली. मात्र त्यामध्ये मोठा मजकूर छापून सदर ठिकाणी विशिष्ट जातीसमूहाच्या महिला असून त्या महिला ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचे नमूद करत महिलांबाबत अश्लील तसेच लज्जास्पद वृत्त छापल्याचे दिसून आले.
त्या वृत्तामुळे समाजातील महिलांमध्ये तसेच विविध जाती धर्मांमध्ये तणाव निर्माण होऊन जाती आणि प्रादेशिक गटांमध्ये तेढ व द्वेष निर्माण होईल तसेच गावातील एकोपा व शांतता बिघडेल असा मजकूर असल्याचे दिसून आले त्यामुळे आज अनेक संघटनांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हजेरी लावत संबंधित संपादकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
याबाबत छाया एकनाथ गायकवाड (वय ४९) रा. भिमनगर कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी महाराष्ट्र क्राईम न्यूज साप्ताहिक चे संपादक एकनाथ शिवराम अडसूळ रा. भिमनगर कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…