रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) आज (दि 30) रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती येथे पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने “सामूहिक अथर्वशीर्ष पठण” कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. तसेच दर्शन रांगेतील भाविकांच्या हस्ते सकाळची व सायंकाळची आरती करण्यात येत आहे श्री महागणपतीच्या पवित्र निर्माल्यापासून बनवलेली अगरबत्ती भाविकांना पूजेसाठी उपलब्ध असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.
संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच भावेश कामदार या भाविकाकडून प्रत्येक चतुर्थी ला ५ कॅरेट केळींचा महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती भजनी मंडळ, यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. तसेच भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी , मकरंद कुलकर्णी, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर पाटील व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…