मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिक्रापुर (योगेश शेंडगे) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्नचीचं पुनरावृत्ती झाली असुन एका अल्पवयीन पोलिस पाटलाच्या मुलीने दि 31 मे 2024 रोजी सकाळी 10: 15 च्या सुमारास मालवाहू पिकउप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असुन दुसरा व्यक्ती जखमी झाला आहे.

 

याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे सतिश विठ्ठल मेमाणे (रा.वडगाव बांडे, ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली असुन दि 31 मे 2024 रोजी सकाळी 10:15 च्या सुमारास मयत अरुण विठ्ठल मेमाणे व त्याचा मित्र महिंद्र राउसाहेब बांडे हे दोघेही स्प्लेंडर मोटार सायकल क्रं एम एच 12 व्ही आर 2072 घेवुन रोहित्राचे (Transformer) ऑइल आणण्यासाठी वडगाव बांडे (ता. दौंड) येथुन न्हावरे गावात निघाले होते. जाताना मोटार सायकल अरुण मेमाणे हा चालवित होता. त्याच्या पाठीमागे महिंद्र बांडे हा बसलेला होता. सदर मोटारसायकल अरणगाव (ता. शिरुर) येथे आली असताना त्यांच्या मोटार सायकलला अरणगावातील पिकअप क्रं एम एच 12 एस एफ 3439 यावरील चालकाने समोरासमोर धडक दिली. यात दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा जखमी झाला.

 

हा अपघात एवढा गंभीर होता की मालवाहु पिकअपने मोटार सायकलसह चालकास 20 ते 30 फुट फरफटत नेले. पिकअप क्रं एम एच 12 एस एफ 3439 अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी (अंदाजे वय 15) चालवत होती. तिच्या सोबत शेजारील सिटवर पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. सदर मुलीने तिच्या ताब्यातील सदरचा पिकअप हा जोरात भरधाव वेगात चालवुन सायकलला समोरुन धडक देवुन सदरचा अपघात केला आहे. तसेच अपघात झाल्यानंतर मदत न करता ते दोघेही पिकअप सोडुन तेथुन निघुन गेले. याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे मयत अरुण मेमाणे यांचा भाऊ सतिश मेमाणे यांनी फिर्याद दिली असुन अल्पवयीन मुलीचे वडील अरणगावचे पोलिस पाटील संतोष लेंडे यांच्यासह अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास शिक्रापुर पोलिस करत आहेत.

 

शिरुर तालुका डॉट कॉमने वर्तविली होती शक्यता…

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या आहेत. त्यामुळे पुण्यासारखीचं दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यात घडू शकते यांचा अंदाज ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने आधीच वर्तवला होता. त्यानंतर काही दिवसातच अरणगाव येथे अल्पवयीन मुलीच्या हातात मालवाहू पिकअप चालविण्यास दिल्याने एक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिरुर तालुक्यात भविष्यात अजुन अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी यावर अंकुश ठेवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

शिरुर तहसिल आणि पोलिसांना कधी जाग येणार…?

शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथे सध्या घोड धरणातून बेकायदेशीररीत्या मोठया प्रमाणात शेतीसाठी काळी माती उपसण्याचा सपाटा काही स्थानिक मातीचोरांनी लावला असुन माती वाहणाऱ्या ट्रॅक्टरवर अल्पवयीन वाहनचालक आहेत. तसेच अनेक ट्रॅक्टर व वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. याबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करत आवाज उठवला आहे. परंतु शिरुरचे महसूल आणि पोलिस प्रशासन यावर कारवाई करण्याचे सोडुन मात्र फक्त बघ्याची भुमिका घेत असल्यामुळे एखादा गंभीर अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार कां…? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या

शिरुर; वाळूमाफिया आणि माती चोरांसाठी हवेलीतील बड्या नेत्याचा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव…?

शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढतेय; एकनाथ शिंदे

ठाणे : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि त्याचा विविध अर्थव्यवस्थांवर परिणाम…

2 मिनिटे ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : आदिवासी विद्यार्थी गेल्या १५ ते २० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलन करत…

7 मिनिटे ago

वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने…

10 मिनिटे ago

प्रारूप मतदार यादीवर काँग्रेसचा आक्षेप; ‘नोटीस मिळणाऱ्या मतदारांची बूथनिहाय यादी जाहीर करा’

मुंबई: एसआयआर (Special Intensive Revision) मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या…

14 मिनिटे ago

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

19 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

23 तास ago