क्राईम

शिरूर तालुक्यात ऑनलाइन गेममधील नैराष्यातून आत्महत्या…

शिक्रापूरः शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा (वाडा पुनर्वसन) येथील एकाने ऑनलाईन गेमचे पैसे विडरॉल होत नसल्याने व उसने पैसे परत करता न आल्याने नैराश्यापोटी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वाडा पुनर्वसन येथील एका ३५ वर्षीय तरुणाने ऑनलाईन गेमचे पैसे विडरॉल होत नसल्याने व मित्रांकडील उसने पैसे परत करता न आल्याने नैराश्यापोटी एकाने गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे ऑनलाईन गेम व त्यामुळे उसने पैसे घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली असून ऑनलाईन गेम आणखी किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे किशोर सुरेश पाटील (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अतुल सुरेश पाटील (वय ३५, रा.वाडा पुनर्वसन नक्षत्र हौसिंग सोसायटी) येथे पत्नी व दोन मुलींसह राहण्यास आहे. मयत अतुल पाटील यांनी ऑनलाईन गेम मध्ये पैसे गुंतले असून ते विडरॉल होत नाही तसेच मित्रांकडून खुप उसने पैसे घेतले आहे त्याचे टेन्शन आले आहे. मला जगण्यात काही अर्थ नाही असे वाटते’ असे तो रामकरण याला म्हणाला तेव्हा त्यांने त्यास समजावुन सांगितले होते व त्यास मदत करण्याचे सांगितले होते.

३१ मे रोजी रात्रौ १०:३० वा. चे सुमारास फिर्यादी कामावरून घरी आले असताना मला भावजय यांचा फोन आला त्या मुलांसह माहेरी गेल्या होत्या व पती उचलत नाही तुम्ही तुमच्या भावाला फोन करा’ असे सांगितल्यावर त्याला फोन केला. परंतु त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर त्याचा शेजारी रामकरण कुमावत याला फोन केला व त्याला त्याचे रूमला जायला सांगितले त्याने त्याचा दरवाजा खुप वेळा वाजविला. परंतु अतुल याने दरवाजा उघडला नाही तेव्हा अतुल पाटील यांचे प्लॅटची पाठीमागील खिडकी उघडी होती तेव्हा शिडी लावुन खिडकीतुन पाहिले असता अतुल पाटील याने त्याचे बेडरूममधील कपडे वाळविण्यासाठी बांधलेली दोरीस गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांचे प्रश्नचिन्ह लागले ऊमटू…

कारेगाव येथे मोटार सायकलची तोडफोड करुन दहशत करणा-या सहा आरोपीना रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रांजणगाव MIDC मध्ये दोन युवकांना मारहाण करत दहशत पसरवुन दुचाकी जाळणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

16 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

16 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

16 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

16 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

21 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

21 तास ago