मुख्य बातम्या

टाकळी हाजीत चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करुन पती फरार…

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील म्हसेफाटा येथे गुरुवारी (दि. २२) रोजी रात्री ललिता महादेव काळे या महिलेचा तिचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरुन कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून केला आहे. म्हसे रोडवर म्हसेफाटा येथे काळे दाम्पंत्याने घरकुल बांधलेले आहेत. या घरकुलामध्ये पाच कुटुंब शेजारी शेजारी राहत आहेत. टाकळी हाजी येथील लताबाई जीवन काळे यांचा महादेव हा जावई आहे. मूळचा सोगाव पश्चिम ता. करमाळा जि.सोलापुर येथील रहिवासी असलेला महादेव याने चार वर्षांपूर्वी ललिता हिच्याशी विवाह केला होता.

त्यांचे दोघांचे कायमच भांडण होत होते. काल गुरुवारी दि.२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची भेट झाली तेव्हा दोघांचे भांडण झाले होते आणि त्यावेळी तो तिला चारित्र्यावरून जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यानेच ललिता हीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला आहे असे ललिताची बहीण चांदणी हिने सांगितले असून शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी औट पोस्ट येथे रितसर खुनाची फिर्याद दाखल केली आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या मोटारसायकलचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी त्याच्या घराकडे पाहिले तेव्हा तो मोटार सायकल चालू करून पळून चाललेला दिसून आला

त्याच्या घरात ललिता हिचा मृतदेह व त्याच्या शेजारी एक दीड वर्षाची मुलगी दिसली. त्यानंतर शेजाऱ्यांनी इतरांना सांगून पोलिसांना कल्पना दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, सहायक फौजदार नाजीम पठाण, पोलीस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस अंमलदार दिपक पवार यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

15 तास ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

20 तास ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

2 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

3 दिवस ago

रांजणगाव सोसायटीची मार्च अखेर शंभर टक्के कर्ज वसुली, नवीन इमारतीसाठी बँकेत 34 लाख मुदत ठेव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कोणत्याही सोसायटीची अर्थिक वसुली साधारणतः जून महिन्यात पुर्ण होत असती ,…

3 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसीत कंपनीचे गोदाम जळून खाक

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील…

3 दिवस ago