मुख्य बातम्या

रायगव्हाण येथे लोकांनी बिबटयासोबत फोटोशूट केल्याने बिबट्याचा मृत्यू…?

श्रीगोंदा: रायगव्हाण शिवारात राजेंद्र घेगडे यांच्या शेतात तापाने फणफणलेला बिबट्या बुधवारी संध्याकाळी दिसला. त्यामुळे गावातील लोकांना शेतात अचानक आलेल्या बिबट्याला हात लावून फोटोशूट करण्याचा मोह आवरला नाही. या फोटोशूटचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र याच प्रकारामुळे बिबट्याने आपले प्राण गमावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या आजारी असलेल्या बिबट्याला उपचारासाठी बेलवंडी येथे नेले. पण तेथे बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्यास न्यूमोनिया झाला असावा, असा वैद्यकीय अहवाल आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात रायगव्हाण येथे बिबट्यासोबतच्या फोटोशूटचा हा प्रकार घडला होता. शेतात आलेला हा बिबट्या आजारी असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याच्या शांतपणाचा गैरफायदा घेत स्थानिक ग्रामस्थांनी फोटोशूट केले. कुणी त्याला हात लावला, कुणी त्याच्या जवळ जाऊन फोटो काढले तर काहींनी या बिबट्याभोवती गराडा घातला. यासंदर्भात रायगव्हाणच्या तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष गणेश बन्शी शिंदे यांनी वन कर्मचारी रणदिवे यांना माहिती दिली. वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर उपचार सुरु केले. मात्र, या आजारी बिबट्याचा रात्री मृत्यू झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बिबट्यांचा मृत्यू…?

श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण आणि येळपणे शिवारात गुरुवार (दि. 22) रोजी एकाच दिवशी 2 बिबट्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन रायगव्हाण परिसरातील नागरिकांनी बिबट्या सोबत फोटोसेशन केले आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचदिवशी येळपणे शिवारात मृत अवस्थेत असलेला दुसरा बिबट्या आढळून आला. या बिबट्याच्या छातीला जखमा होत्या. रायगव्हाण येथील फोटोसेशनमुळेच त्या आजारी बिबट्याचा बळी गेल्याचे बोलले जात असुन फोटोशूट करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

6 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

10 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

10 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

10 तास ago