शिरुर तालुक्यातील सनसवाडीतील खळबळजनक घटना
शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे एका परप्रांतियाने पत्नीला घराबाहेर कपडे धुण्यास सांगून घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली तर राजनाथ छोटेलाल गौतम असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथे राजनाथ गौतम हा त्याचा पत्नीसह राहण्यास असून ९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळ च्या सुमारास राजनाथ याने त्याच्या पत्नीला घरा बाहेर कपडे धुण्यास सांगितले. त्याचवेळी राजनाथ याने दरवाजा लावून घेतल्याने त्याच्या पत्नीने त्याला आवाज दिला. मात्र त्याने प्रतिसाद न दिल्याने शेजारील नागरिकांनी दरवाजाची कडी तोडून आतमध्ये गेले असता राजनाथ छोटेलाल गौतम (वय २४) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. मामपूर सराय ता. त्रिलोकी उत्तरप्रदेश याने ओढनीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले
याबाबत सन्नो राजनाथ गौतम (वय २०) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. मामपूर सराय ता. त्रिलोकी उत्तरप्रदेश यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…