मुख्य बातम्या

घोड धरणातुन बेकायदेशीर वाळु उपसा सुरुच; प्रशासन हतबल…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणातुन महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळूमाफिया बेसुमार वाळू उपसा करत असुन हे वाळू माफिया प्रशासनालाही जुमानत नसल्याने महसूल व पोलिस प्रशासन अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र शिरुर तालुक्यात पहायला मिळत आहे.

सध्या विधानसभा तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुका जवळ आल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही बेकायदेशीर वाळूउपशा बाबत बघ्याची भुमिका घेऊन गप्प बसले आहेत. त्यामुळे या वाळू माफियांना आणखीनच बळ मिळत आहे. तसेच शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारीही याकडे कानाडोळा करत असल्याने घोड धरणाची पुर्णपणे वाट लागल्यावर प्रशासनाला जाग येणार का…? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

 

लिलाव सरकारचा अन फायदा मात्र ठेकेदाराचा…?

गेल्यावर्षी महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू मिळावी यासाठी घोड धरणातील वाळूचा लिलाव केला होता. त्यावेळी वाळूचा लिलाव घेणाऱ्या ठेकेदाराने स्वतःच्या नातेवाईकांच्या नावावर ऑनलाईन बुकिंग करत लाखो ब्रास वाळूचा काळाबाजार केला. परंतु स्थानिक लोकांना मात्र शासन नियमानुसार वाळू दिली नाही. त्यामुळे स्थानिकांना या सरकारी लिलावाचा किती फायदा झाला आणि स्थानिकांना बांधकाम करण्यासाठी शासन दराप्रमाणे किती वाळू मिळाली हा संशोधनाचा विषय आहे.

 

शासनाचा करोडोंचा महसुल बुडतोय पण…

घोड धरणात सध्या वाळूचा कसलाही लिलाव झालेला नसतानाही घोड धरणाच्या मुख्य दरवाज्यापासुन सुमारे दोन किलोमीटर अंतरावर रात्रीच्या वेळेस यांत्रिक बोटींच्या साह्याने रोजच रात्रीच्या वेळेस मोठया प्रमाणात बेसुमार बेकायदेशीर वाळू उपसा चालुच असुन शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत असतानाही महसूल प्रशासन बघ्याची भुमिका घेत आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी याकडे लक्ष देणार का…? घोड धरणाची पुर्णपणे वाट लागल्यावर शासनाला जाग येणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

 

कायदा अन सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता…?

घोड धरणात सध्या शिरुर तालुक्यातील कुऱ्हाडवाडी, गुनाट, चिंचणी तर श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे, दाणेवाडी या गावातील वाळू माफिया यांत्रिक बोटींच्या साह्याने रात्रीच्या वेळेस बेकायदेशीररीत्या बेसुमार वाळू उपसा करत असुन यापुर्वी वाळू उपशाच्या वादातून अनेकवेळा भांडणेही झालेली आहेत. तसेच काही दिवसांपुर्वी घोड धरणात बेकायदेशीररीत्या चाललेल्या वाळू उपशावरुन यांत्रिक बोटीवरील एका परप्रांतीय कामगाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांकडुन माहिती मिळाली असुन हे प्रकरण आप-आपसात समजोता करुन मिटवले असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु असुन या अवैध वाळू उपशामुळे भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

(क्रमशः)

शिरुर तालुका डॉट कॉम व रामलिंग महिला उन्नती च्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

शिरूर! तक्रार मागे घे, नाहीतर पुन्हा जिवंत सोडणार नाही

बापरे! शिरूर तालुक्यात एकाच रात्रीत चोरटयांनी केली १३ विद्युतपंपांची चोरी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

6 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

6 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

22 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

22 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

22 तास ago